मुंबई: आयपीएलची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज आयपीएल 2025 च्या हंगामातले दोन महत्वाचे सामने खेळले जाणार आहेत. दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता क्नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने असतील. तर रात्री आठ वाजता होणाऱ्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाबचा संघ अशी लढत होईल.
कोलकाता आणि लखनऊचा सामना
कोलकाता आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघातला सामना 4.00 वाजता कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडीयमवर सुरू होईल. आयपीएलच्या गुणतालिकेचा विचार केला असता सध्या कोलकाता 5 व्या तर लखनऊचा संघ 6 व्या स्थानावर आहे. दोन्ही संघांकडे प्रत्येकी 4 गुण आहेत. आपले गुणतालिकेतील स्थान सुधारण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत.

कोलकात्याच्या संघाची मदार प्रामुख्याने कॅप्टन अजिंक्य रहाणे, फलंदाज मनीष पांडे, रिंकू सिंग, आंद्रे रसल यांच्या वर असणार आहे. तर कोलकाता संघाची गोलंदाजीची धुरा सुनील नरीने याच्यावर असेल. तर लखनऊच्या संघाचा विचार केला असता कॅप्टन रिषभ पंत, अॅडम मार्करम, डेविड मिलर, मिशेल मार्श यांची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये खेळले गेलेल्या शेवटच्या पाच सामन्यांचा विचार केला असता लखनऊने 3 तर कोलकात्याच्या संघाने 2 सामने जिंकले आहेत.
सुपर किंग्स विरूद्ध पंजाब किंग्स
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स इलेव्हन यांच्यातील सामना रात्री 8 वाजता चंदीगढमध्ये खेळला जाणार आहे. पंजाबचा संघ यंदाच्या मोसमात चांगल्या स्थितीत आहे, कारण आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाला विजय मिळवता आलाय, गुणतालिकेत पंजाब चौथ्या स्थानावर असून पंजाबकडे 4 गुण आहेत. तर चेन्नईची कामगिरी या सीझनमध्ये निराशाजनक राहिली आहे. आजवर खेळलेल्या 4 पैकी अवघ्या एका सामन्यात या संघाला विजय संपादीत करता आलाय, तरक तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केलाय.
पंजाबची धुरा कॅप्टन श्रेयस अय्यर, हरनुल सिंग, वढेरा, एस. स्टॉनिस, लॉकी फर्ग्युसन यांच्या खांद्यावर असेल. चेन्नईची धुरा कॅप्टन ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉन्वे, एम. एस धोनी, शिवम दुबे, रचिन रविंद्र यांच्यावर जबाबदारी असेल.