दिल्लीचा पराभव करत गुजरातची प्ले ऑफमध्ये एन्ट्री; सुदर्शन आणि गिलची निर्णयाकडे खेळी

बंगळूर आयपीएल मधील आता प्ले ऑफसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. पंजाब आणि बंगळूर यांनी प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे. तर रविवारी गुजरातने दिल्लीचा पराभव करून प्ले ऑफसाठी आपले स्थान बळकट केले आहे. तर आता मुंबई की दिल्ली प्ले ऑफसाठी पात्र ठरणार, याची मात्र सर्वांना उत्सुकता लागली आहे.

IPL 2025 : भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाची परिस्थिती होती, त्यामुळे आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता गेल्या आठवड्यापासून पुन्हा आयपीएलला सुरुवात झाली आहे. दरम्यान, रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामन्यात गुजरात आणि दिल्ली यांच्यात लढत झाली. दिल्लीने धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र हे आव्हान गुजरातने शुभमन गील आणि साई सुदर्शन यांच्या धडाकेबाज खेळीने लीलया पार करत, गुजरातने थेट प्ले ऑफमध्ये आपले स्थान बळकट केले आहे.

दिल्लीचा 200 धावांचा डोंगर…

दरम्यान, दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना गुजरात समोर 200 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. मात्र हे आव्हान एकही विकेट न गमावता गुजरातने पूर्ण केले. सलामवीर फलंदाज साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. आणि अवघ्या 19 व्या षटकातच गुजरातने लक्ष पार केलं. साई सुदर्शन 61 चेंडूमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 108 धावांची धुवांधार नाबाद खेळी केली. तर शुभमन गिलने 53 चेंडूत तीन चौकार आणि सात षटकार लगावत 93 धावा चोपून काढल्या. त्यामुळे गुजरातच्या या विजयासह गुजरातचे प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जाते.

प्ले ऑफसाठी मुंबई दिल्लीत चुरस…

दुसरीकडे रविवारी गुजरातने दिल्लीवर विजय मिळवत प्ले ऑफच्या फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर दुसरीकडे याधीच पंजाब आणि बंगळुरू प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहेत. आता गुजरातने दिल्लीवर विजय मिळवल्यामुळे मुंबई आणि दिल्लीपैकी एक संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतो. तसेच गुजरात गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे प्ले ऑफमध्ये आता कोणते संघ जाणार, याची क्रिकेट चहात्यांना उत्सुकता लागली आहे. कारण दिल्लीचा गुजरातकडून पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबई की दिल्ली या संघात आता कोणता संघ पुढील सामन्यात दिसणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News