काव्या मारनसाठी गुड न्यूज, ब्लॅकमेल प्रकरणानंतर राज्य सरकारचा दिलासा, हैदराबामध्ये सामने होणार

Sunrisers Hyderabad: काव्या मारन आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी आता गुड न्यूज आली आहे. कारण राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर त्यांना कोणता दिलासा मिळाला आहे, जाणून घ्या..

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण बाई काव्या मारन यांच्यासाठी आता एक गुड न्यूज आली आहे. ब्लॅकमेल प्रकरणात थेट तेलंगणा सरकारने लक्ष घातले होते आणि चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता काव्या मारन यांना दिलासा मिळाला आहे. कारण आता सनरायझर्सचे सर्व घरच्या मैदानातील सामने हैदराबादलाच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय…

काव्या मारन यांच्या सनरायझर्सच्या संघाने घरच्या मैदानात म्हणजेच हैदराबादमध्ये खेळण्यास नकार दिला होता. कारण हैदराबाद संघटनेचे पदाधिकारी आपल्याला मोफत पासेस मागून ब्लॅकमेल करतात, असा आरोप काव्या मारन यांच्या सनरायझर्सच्या संघाने केला होता. या प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी लक्ष घातले आणि त्यानंतर काव्या मारन यांच्या सनरायझर्स हैदराबाद या संघाला दिलासा मिळाला आहे.

तेलंगणा सरकारने काय भूमिका घेतली होती..

आम्ही फ्री पासेससाठी होणाऱ्या ब्लॅकमेलिंग कंटाळलो आहोत, त्यामुळे हैदराबादमध्ये खेळण्याची आमची इच्छा नाही, असे सनरायझर्स संघाच्या व्यवस्थापनाने सांगितले. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या प्रकरणात लक्ष घातले. आयपीएस अधिकारी के. श्रीनिवास रेड्डी या प्रकरणाची चौकशी करतील आणि लवकरच अहवाल सादर करतील, असे म्हटले आहे. या अहवानंतर आता कोणाची चूकी असल्याचे समोर आले आहे.

अखेर कोणता निर्णय झाला..

सनरायझर्स हैदराबादच्या हैदराबादमधील प्रत्येक सामन्याच्या वेळी हैदराबाद क्रिकेट संघटनेला ३९०० मोफत पास देण्याच्या यापूर्वीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे हैदराबाद संघटनेने स्पष्ट केले. त्यामुळे हा काव्या मारन आणि त्यांच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी मोठा दिलासा आहे. कारण त्यांना संघटनेला जास्त कोणतेही पासेस द्यावे लागणार नाहीत आणि त्यांना घरच्या मैदानातच खेळता येणार आहे. त्यामुळे आता त्यांना खेळण्यासाठी दुसऱ्या राज्यातील मैदान शोधावे लागणार नाही. त्याचबरोबर हैदराबाद संघटना आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील वाद संपला असल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

हैदराबादच्या क्रिकेट संघटनेकडून नकार…

हैदराबाद संघटना, सनरायझर्स हैदराबाद आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यातील कराराची अंमलबजावणी करण्याची सूचना सनरायझर्स हैदराबादकडून करण्यात आली. यापूर्वीच्या करारानुसारच संघटनेला उपलब्ध तिकिटांपैकी दहा टक्के तिकिटे देण्याचे मान्य झाले आहे. आपल्याला हैदराबाद संघटना ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याचा दावा सनरायझर्स हैदराबादने केला होता. मात्र, त्यात तथ्य नसल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले.


About Author

Pratik Chourdia

Other Latest News