इंग्लंडचा हा संघ अवघ्या २ धावांत गारद झाला, ८ फलंदाज शुन्यावर बाद, विरोधी संघाने ठोकल्या ४५ षटकात ४२६ धावा

इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट लीग सुरू आहे. या लीगमध्ये नॉर्थ लंडन सीसी (North London CC) आणि रिचमंड सीसी, मिडेक्स (Richmond CC, Middx) यांच्यात सामना खेळवण्यात आला.

England Team All-Out Just 2 Runs: भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका २० जूनपासून सुरू होईल आणि ४ ऑगस्टपर्यंत चालेल. दरम्यान, भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी काउंटी क्रिकेट लीगशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. या लीगमध्ये एक संघ अवघ्या २ धावांवरच ऑलआउट झाला. विशेष म्हणजे या संघाचे ८ खेळाडू शुन्यावर पॅव्हिलियनमध्ये परतले.

नॉर्थ लंडन सीसीने ४५ षटकांत ४२६ धावा ठोकल्या

इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट लीग सुरू आहे. या लीगमध्ये नॉर्थ लंडन सीसी (North London CC) आणि रिचमंड सीसी, मिडेक्स (Richmond CC, Middx) यांच्यात सामना खेळवण्यात आला. नॉर्थ लंडन डॉट प्ले-क्रिकेट डॉट कॉमनुसार, या सामन्यात नॉर्थ लंडन सीसीने रिचमंड सीसी, मिडेक्सचा ४२४ धावांनी दणदणीत पराभव केला.

नॉर्थ लंडन सीसीने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ४२६ धावांचा डोंगर उभारला. संघाचा सलामीवीर डॅनिएल सिमन्सने १४० धावांची झंझावाती खेळी केली. मात्र इतर कोणताही फलंदाज अर्धशतकही करू शकला नाही. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या रिचमंड सीसी, मिडेक्ससमोर एक प्रचंड मोठे आव्हान उभे राहिले.

रिचमंड सीसीचा संघ २ धावांवर गारद झाला

रिचमंड सीसीच्या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांसमोर अक्षरशः शरणागती पत्करली. संपूर्ण संघ फक्त ५.४ षटकांत २ धावा करत ऑल आउट झाला, त्यातील एक धाव वाइडच्या रूपात मिळाली. संघासाठी एकमेव वैध धाव फलंदाज टॉम पिट्राइडिस याने केली.

या लाजिरवाण्या पराभवात रिचमंड सीसी, मिडेक्सला नॉर्थ लंडन सीसीकडून ४२४ धावांनी जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला. नॉर्थ लंडन सीसीकडून थॉमस स्पॉटन आणि मॅथ्यू रॉसन यांनी बळी घेतले आणि प्रतिस्पर्धी संघाला झटपट गुंडाळले. तर मॅथ्यूने जैमी ह्यूमनला धावबाद करत आणखी एक बळी मिळवला.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News