मच्छिमारांनी उत्पादनात वाढ करण्यासाठी तलावातील गाळ काढण्याच्या कामास गती द्यावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई : कोळी बांधव आणि मच्छिमारांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. दरम्यान, राज्यातील स्थानिक मच्छिमारांचे उत्पादन वाढविण्यासाठी उच्च दर्जाचे मत्स्यबीज उपलब्ध करावेत, तसेच नागपूर जिल्ह्यातील तलावातील गाळ काढणे आणि अतिक्रमण निष्कासित करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात यावी. यासह पावसाळ्यापूर्वी तलावांमधील गाळ काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. 

गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढवावा…

दरम्यान, पुढे बोलताना राणे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र उभारावे, मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारावेत, तसेच मत्स्यबीज संगोपन केंद्र उभारण्यासाठीच्या कार्यास गती देण्याचे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. याबाबत कार्यवाही करून तातडीने अहवाल सादर करण्यात यावेत. यासह विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढवावा आणि महत्वाचे म्हणजे मत्स्यव्यवसायिकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.

राष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभे करु…

मत्स्य व्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने राष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या परिसरातील जागा निश्चितीकरण करावी, आणि त्यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावा.  १६३०१ हेक्टर क्षेत्रात असलेल्या जलाशय मासेमारीकरिता लिलावात देण्यात यावे. सोमवारी विदर्भासह नागपूर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय कामांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालय येथील दालनात पार पडली. यावेळी आयुक्त किशोर तावडे, प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी वरील कामास गती देण्यात यावी, आणि मच्छिमारांनी उत्पादनात वाढ करण्यासाठी तलावातील गाळ काढण्याच्या कामास गती द्यावी, असंही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

 


About Author

Astha Sutar

Other Latest News