जगातील अनेक देश आपली नागरिकता “विकतात”, म्हणजेच एक विशिष्ट रक्कम भरून तुम्ही त्या देशाचा गोल्डन व्हिसा मिळवू शकता आणि आयुष्यभरासाठी तिथे स्थायिक होऊ शकता. अशीच एक बातमी दुबईमधून आली होती. यात सांगितले होते की, दुबई सरकार फक्त २३ लाख रुपयांमध्ये गोल्डन व्हिसा देत आहे, ज्यामुळे तिथे कायमस्वरूपी राहता येते. मात्र, आता संयुक्त अरब अमीरात (UAE) सरकारने या बातम्यांचे खंडन केले आहे.
सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की गोल्डन व्हिसासाठी नियम बदलले गेलेले नाहीत. सर्व नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. जे लोक गोल्डन व्हिसा घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी सरकारच्या अधिकृत वेबसाइट किंवा स्मार्ट अॅपद्वारेच योग्य माहिती घ्यावी.

दुबई सरकारच्या स्पष्टतेनंतर लोक गोल्डन व्हिसाबाबत अधिक जाणून घेऊ लागले आहेत. तर चला जाणून घेऊया की दुबईचे गोल्डन व्हिसा प्लॅन काय आहे आणि यात कोणकोणत्या सुविधा मिळतात?
गोल्डन व्हिसा प्लॅन काय आहे?
संयुक्त अरब अमीरातमध्ये गोल्डन व्हिसासाठी काही ठराविक नियम आहेत. हा व्हिसा फक्त त्या व्यक्तींनाच दिला जातो जे ठराविक श्रेणीमध्ये येतात. यात खालील प्रकारच्या व्यक्तींचा समावेश होतो:
गुंतवणूकदार (Investors)
विशेष कौशल्य असलेले लोक (Special talents)
शास्त्रज्ञ (Scientists)
स्टार्टअप मालक (Startup owners)
डॉक्टर
खेळाडू (Athletes)
हे लक्षात घ्या की हा व्हिसा दुबईमध्ये आयुष्यभर राहण्याची थेट परवानगी देत नाही. मात्र, गोल्डन व्हिसा धारकांना UAEमध्ये अनेक वेळा ये-जा (multiple entry) करण्याची परवानगी मिळते. सामान्यतः याची वैधता १० वर्षांपर्यंत असते, आणि काही अटींवर हे रिन्यू करता येते.
गोल्डन व्हिसा मिळाल्यावर काय सुविधा मिळतात?
यूएई सरकार गोल्डन व्हिसा धारकांना अनेक महत्त्वाच्या सुविधा देते:
स्थानिक स्पॉन्सरशिवाय व्यवसाय सुरू करता येतो.
नोकरी आणि प्रॉपर्टी खरेदी करण्यास मोकळीक.
गोल्डन व्हिसा धारक व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य, शिक्षण व सरकारी सेवा यूएईच्या नागरिकांप्रमाणेच मिळतात.
त्यांच्या मुलांना सरकारी शाळा आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकतो.
जर गोल्डन व्हिसा धारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना परवानगी संपेपर्यंत यूएईमध्ये राहता येते.