युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यात अनेक विमान उद्ध्वस्त, 5 एयरबेसवर स्टाईक केल्याचं रशियानही केलं मान्य

युक्रेनने रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाचं मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनने या हल्ल्यात नष्ट केलेल्या Tu-95 चा एक व्हेरियंट एकेकाळी भारतीय सैन्यासाठी महत्त्वाचा होता.

मॉस्को – रशिया आणि युक्रेन युद्ध आणखी तापण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ले, रशियातील पाच एयरबेस उद्ध्वस्त झाल्याचं रशियानं मान्य केलंय. या हल्ल्यात अनेक विमानांचं नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र नेमक्या किती विमानांना याचा फटका बसलाय हे मात्र अधिकृत जाहीर करण्यात आलेलं नाही.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं युक्रेनवर आरोप केला आहे की, रशियातील पाच एयर बेसवर ड्रोननं दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यातील तीन एयरबेसवरील हल्ले परतवण्यात आल्याचंही रशियाकडून सांगण्यात आलंय.

रशियाची 41 विमानं उद्ध्वस्त केली, युक्रेनचा दावा

रशियाची 41 युद्ध विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा युक्रेननं रविवारी केला होता. रशियातील पाच एयर बेसवर हल्ला केल्याचं युक्रेनी वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं. युक्रेनच्या सैन्यदलानं हे हल्ले केल्याचंही जाहीर करण्यात आलं. हल्ल्यासाठी फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोनचा वापर करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. स्वसंरक्षणासाठी हा हल्ला करण्यात आल्याचं युक्रेनच्या सैन्यदलानं सांगितलं होतं. रशियाकडून सातत्यानं युक्रेनच्या शहरात बॉम्ब हल्ले होत असल्यामुळं हा हल्ला करण्यात आल्याचं युक्रेनच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. हल्ल्यात रशियाचं 17 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला.

दीड वर्षांपासून युक्रेनची तयारी

इस्तांबुलमध्ये दोन्ही देशात शांतीवार्ता होण्यापूर्वी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरील हल्ल्याची तीव्रता वाढल्याचं दिसतंय. रशियानं बॉम्बहल्ले थांबवले नाहीत तर हल्ले करण्यात येतील, अशा इशाराही युक्रेनच्या वतीनं देण्यात आलाय. या हल्ल्याची तयारी गेल्या दीड वर्षांपासून युक्रेन करत असल्याची माहितीही समोर आलीय. हे ड्रोन चोरीच्या मार्गानं रशियात पाठवण्यात आले आणि तिथं लपवून ठेवण्यात आले होते. हल्ल्यावेळी ज्या ट्रकमधून ड्रोन नेण्यात आले, त्यातूनच त्यांचं लाँचिंग करण्यात आलं.


About Author

Smita Gangurde

Other Latest News