दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल तब्बल 27 पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर दहशतवादी हल्यांमध्ये मोठी घट झाली होती. मात्र, आज पहलगामध्ये झालेला हल्ला हा मागील पाच वर्षातील सर्वात मोठा हल्ला मानला जातो आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार मागील पाच वर्षात तब्बल सुरक्षा दलातील जवान आणि नागरिक असू मिळून 350 जणांना दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. तर, सुरक्षा दलांनी 450 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
370 कलम हटवण्याची आधी 2018 मध्ये तब्बल 228 दहशतवादी हल्ले झाले होते. मात्र, 370 कलम हटवल्यानंतर 2023 मध्ये हे प्रमाण 81 टक्क्यांनी कमी होईल अवघे 41 हल्ले झाले होते. केंद्र सरकारने लोकसभेत दहशतवादी हल्ले कमी झाल्याची आकडेवारी सादर केली होती.

2019-2023 पाच वर्षातील दहशतवादी हल्ले
370 कलम हटवणे हा मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक समजला जातो. 2019-2023 पाच वर्षात दहशतवादी हल्ल्यांची संख्या लक्षणीय घटली. केंद्र सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2029 मध्ये 153 हल्ले झाले होते. 2020 मध्ये 126 हल्ले, 2021 मध्ये 129 हल्ले तर 2022 मध्ये 125 हल्ले झाले. 2023 मध्ये हल्ल्यांची संख्या तब्बल 80 टक्यांनी कमी झाली. या वर्षात केवळ ४३ हल्ले झाले.
2024 मध्ये 61 दहशतवादी हल्ले
एका इंग्रजी वर्तमानपत्रातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 2024 मध्ये 61 दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात सुरक्षा दलातील 18 जवानांचा मृत्यू झाला तर 13 दहशतवाद्यांना संपवण्यात सुरक्षा दलाला यश आले. जम्मू काश्मीरमधील डोडा, कठुआ, रेसी या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी हल्ले झाले होते तसेच सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या होत्या.
2024 मधील उल्लेखनीय घटना
2024 मधील जून महिन्यात रेसी जिल्ह्यात हिंदू यात्रेकरूंवर हल्ला झाला होता त्यात 9 जणांचा मृत्यू तर 41 जण जखमी झाले होते. 9 जुलैला कुठवा जिल्ह्यात लष्काराच्या ताफ्यावर दहशदवाद्यांनी हल्ला केला होता त्यामध्ये 9 जवान शहीद झाले होते. गेल्यावर्षीच ऑक्टोबर महिन्यात सोनमार्गजवळ बोगदा प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यामध्ये 7 जनांचा मृत्यू झाला होता.