दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला पंजाब विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय विश्वात कोणतही मोठं यश मिळवता आलेलं नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पक्षाला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. पक्षातून वेगळे होत काही नगरसेवकांनी वेगळा पक्षचं स्थापन केला आहे. आता याची कायदेशीर लढाई होईल, पक्षाला मान्यता मिळेला का? हा पुढचा भाग. मात्र सध्या केजरीवालांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
15 नगरसेवक फुटले, नवा पक्ष कोणता?
दिल्लीतील आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी, 17 मे 2025 रोजी, आपच्या 15 नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ‘इंद्रप्रस्थ विकास पार्टी’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. या गटाचे नेतृत्व ज्येष्ठ नगरसेवक मुकेश गोयल करणार आहेत. या निर्णयामागे पक्षाच्या अंतर्गत असंतोष, नेतृत्वाशी असलेले मतभेद, आणि विकासकामांबाबत असलेली निष्क्रियता हे कारणे सांगितली जात आहेत. मुकेश गोयल यांनी या गटाच्या स्थापनेसाठी ‘इंद्रप्रस्थ विकास पार्टी’ची स्थापना केली असून, त्यांचा उद्देश नगर निगममध्ये स्वतंत्र आणि लोकाभिमुख राजकारण करणे आहे .

दिल्लीतील राजकारण बदलणार?
या घटनाक्रमामुळे दिल्लीतील स्थानिक राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. आपच्या नगरसेवकांच्या या विलीनीकरणामुळे पक्षाच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो. या नवीन पक्षाच्या स्थापनेमुळे दिल्लीतील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि आगामी महापौर निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या घटनाक्रमावर भाजपने प्रतिक्रिया देताना, आपच्या अंतर्गत गोंधळामुळे हे विलीनीकरण झाले असल्याचे सांगितले आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी आरोप केला की, आपच्या अंतर्गत असंतोषामुळे हे नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत . या घटनाक्रमामुळे दिल्लीतील स्थानिक राजकारणात नवा मोर्चा उभा राहिल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
इंद्रप्रस्थ विकास पार्टीच्या स्थापनेमुळे दिल्लीतील स्थानिक राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.आपची बहुमत स्थिती डळमळीत होऊ शकते. महापौर निवडणूक, समित्यांमधील प्रतिनिधित्व आणि निर्णयप्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजप आणि इतर पक्षांसाठी ही संधी ठरू शकते. आगामी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.