मुंबई : गेल्यावर्षी अंदाज वर्तवलेल्यापेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे यावर्षी मान्सूनचा नेमका अंदाज काय असणार याची चर्चा सुरु होती. देशातील आघाडीची हवामान विषयक अंदाज करणाऱ्या स्कायमेटने 2025 मध्ये मान्सून कसा असणार आहे? याचा आपला अंदाज जाहीर केला आहे.
स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मध्ये सरासरी 103 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे या अंदाजामध्ये पाच टक्के वाढ किंवा घट होण्याची शक्यता देखील स्कायमेटकडून वर्तवण्यात आली आहे.

संपूर्ण देशाचा विचार केला तर यंदाचा मान्सून हा सामन्य राहण्याचे वर्तवण्यात आले आहे. दर, पश्चिम घाटामध्ये मात्र दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 868.6 एमएम पाऊस पडेल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
ला निनाचा धोका नाही
ला निनाचा परिणाम हा मान्सूवर होत असतो. मात्र, यंदा स्कायमेटच्या माहितीनुसार, ला निना या हंगामात कमकुवत असेल त्याचाल कुठलाही परिणाम मान्सूनवर होणार नाही. ला निनाचा परिणाम होणार नसल्याने यंदाचा मान्सून चांगला होण्याची शक्यता आहे.
ला निना म्हणजे काय?
ला निना हा हवामान विषयक एक नैसर्गीक घटक आहे. या काळात पॅसिफिक महासागरातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा थंड होते. त्याचा परिणाम जागतिक हवामानावर तसेच भारताच्या मान्सूवर देखील होतो.
महाराष्ट्रात चांगला पाऊस
स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम घाटातील केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टी आणि गोव्यात दमदार पाऊस असणार आहे. तर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात देखील चांगला पाऊस असेल. पश्चिम आणि दक्षिण भारतात पाऊसाची सरासरी चांगली असेल. मात्र, उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीच्या पेक्षा कमी पाऊस होईल.
जुलैमध्ये धुव्वाधार
जुन ते सप्टेंबर हा मान्सूनच्या कालावधीमध्ये जुलै महिन्यात सर्वाधिका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिन्यात 280 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तर, जून महिन्यात 165.3 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात 108 टक्के तर, सप्टेंबर महिन्यात 104 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मजला जातो.