अहमदाबादमध्ये 12 जून 2026 रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत भारतीय विमान दुर्घटना तपास ब्युरोने आपला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. संबंधित अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये दिल्यानुसार, विमानाने टेकऑफ केल्यानंतर पुढील काही सेकंदात विमानाचे दोन्ही इंजिन अचानक आपोआप बंद झाले होते. यामुळे विमान खाली कोसळल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे तांत्रिक कारणामुळेच अपघात झाला का? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.
विमानाचा इंधन पुरवठा बंद झाल्याचे समोर
विमान सकाळी साधारण 8.08 वाजता 180 नॉट्स अधिकांश इंडिकेटेड एअरस्पीडपर्यंत पोहोचले होते. याच्यानंतर लगेलचच इंजिन 1 आणि इंजिन 2 च्या इंजिन कट ऑफ स्विच (ज्यातून इंजिनला इंधर पोहोचले जाते) RUN हून CUTOFF पोझिशनपर्यंत पोहोचलं आणि एका सेकंदात इंजिनमध्ये इंधन पोहोचणं बंद झालं आणि दोन्ही इंजिन Na1 आणि N2 रोटेशन स्पीडने जलद गतीने खाली आलं. परंतु, हा इंधन पुरवठा बंद झाला कसा? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.

दोन्ही पायलटांमधील धक्कादायक संभाषण
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एक पायलट दुसऱ्याला पायलटला तू इंजिन का बंद केलं, असं विचारत होता. मी काहीच केलं नसल्याचं दुसऱ्या पायलटने उत्तर दिलं होतं. या संभाषणावरुन या दुर्घटनेच अधिक संशय व्यक्त केला जात आहे. कारण दोन्ही पायलटांनी इंजिन बंद केलं नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे हा इंजिनमधील तांत्रिक बिघाड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अद्याप तपासात कोणताही बिघाड कळू शकलेला नाही.
विमान सावरण्याचा पायलटकडून प्रयत्न झाला?
ऑटोस्टार्ट मोड सुरू झाला. मात्र तरीही विमान स्थिर होऊ शकलं नाही. एअरपोर्टच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासानंतर असंही समोर आलंय की, टेकऑफच्या लगेचच विमानाची रॅम एअर टर्बाईन म्हणजेच आपत्कालिन पंखा बाहेर आला होता. सर्वसाधारणपणे विमानाच्या वीज पुरवठ्यात अडथळा आल्यानंतर Ram Air Turbine किंवा पंखा बाहेर निघतो. याचा अर्थ इंजिन बंद झाल्यामुळे विमानाच्या मुख्य वीज पुरवठ्यात परिणाम झाला होता. त्यामुळे या तपासातून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.