Black Monday : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे कोट्यवधी बुडण्याची शक्यता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफसंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी खळबळ पाहायला मिळत आहे.

मुंबई : सोमवार म्हणजेच आठवड्याच्या आर्थिक उलाढालीचा पहिलाच दिवस (Share Market) मुंबई शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे (Black Monday) ठरलाय. बाजार उघडताच मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालंय. सेन्सेक्स 3000 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालंय. तर निफ्टीत 900 अंकांची घसरण पाहायला मिळाली आहे. टॉप 50 निफ्टींपैकी 49 कंपन्यांच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालंय.

Stock Market LIVE Updates

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

टाटा स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिसचे शेअर्स सुमारे 10 टक्क्यांनी घसरले आहेत. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, एल अँड टीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळतेय.
आयटी, तेल आणि वायू कंपन्यांना मोठा फटका झाल्याचं दिसतंय.

का घसरतोय बाजार?

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या टेरिफमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट आल्याचं मानण्यात येतंय. या टेरिफमुळे अमेरिकेला फायदा होणार असला तरी भारतातून निर्यात करणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के टेरिफ आकारण्यात येणार आहे. उतर देशांवरही असाच टेरिफ आकारण्यात आलाय. याचा फटका भारतासह मोठ्या देशांना बसणार आहे. त्याचे परिणाम शेअर बाजारावरही होताना पाहायला मिळतायेत.
  • अमेरिकेनं उचललेल्या या टेरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी इतर देशही सरसावले आहेत. चीनने अमेरिकेवर 36 टक्के प्रत्युत्तर कर आकारण्याचा निर्णय घेतलाय. हा नवा टेरिफ 10 एप्रिलपासून लागू होईल. चीन-अमेरिका या वादाचा परिणाम येत्या काळात जगभरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचाही परिणाम बाजारावर झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
  • टेरिफमुळे वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.त्यामुळे देशात आार्थिक मंदीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सगळ्याचा परिणाम गुंतवणुकदारांच्या मानसिकतेवर झाल्याचं दिसतंय. यातून बाजारात विक्रीची चढाओढ लागण्याची शक्यता आहे.

About Author

Smita Gangurde

Other Latest News