पहलगाम : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या पर्यटन स्थळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 27 पर्यकांचा मृत्यू झाली माहिती आहे. 370 कलम हटवल्यानंतर हा पहिलाच पर्यटकांवरील मोठा हल्ला आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना जखमी आणि हल्ल्यातील पीडित नागरिकांना सर्व मदत करण्याचे आश्वास पंतप्रधानांनी दिले आहे. तसेच या हल्ल्यामागे असणाऱ्या सोडले जाणार नाही, असे इशाराही त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या जवळील व्यक्तींना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळवून दिला जाईल…त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत आहे.
मृत्यांचा आकडा वाढण्याची भीती
दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. विशेष म्हणजे पीटीआयच्या सुत्रांनी देखील मृतांचा आकडा हा 20 पेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मृत्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘कश्मीर रेझिस्टन्स’ या संघटनेने घेतली आहे.