पीएम किसानचा 20वा हप्ता अक्षय्य तृतीयेनंतर? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

पीएस किसान निधीचा 20 वा हप्ता अक्षय्य तृतीयेनंतर वितरीत केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नवी दिल्ली: नियमांनुसार, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये येणे अपेक्षित आहे, परंतु केंद्र सरकारने अद्याप त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, असं असलं तरी एकीकडे हा हप्ता अक्षय्य तृतीयेनंतर येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यांमध्ये 2000 रुपये दिले जातात. हा लाभ अशा शेतकऱ्यांना उपलब्ध आहे ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे आणि जे भारताचे नागरिक आहेत. आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसान योजनेचे 19 हप्ते जारी केले आहेत आणि आता शेतकरी
पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत.

 

कधी येणार 20 वा हप्ता?

आता पुढील हप्ता एप्रिल ते जुलै 2025 दरम्यान जारी होण्याची अपेक्षा आहे. 4 महिन्यांनुसार 20 व्या हप्त्याची वेळ जून 2025 मध्ये असेल.
9.70 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.
पंतप्रधान किसान योजनेच्या नियमांनुसार, पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट
ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो. त्यामुळे हा हप्ता अक्षय्य तृतीयेनंतर येण्याची शक्यता आहे.

 

खालील कागदपत्रे आवश्यक:

 

योजनेच्या 20 व्या हप्त्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी eKYC, जमिनीच्या नोंदी पडताळणी, बँक खाते आधारशी जोडणे आणि NPCI DBT पर्याय चालू करणे ही कामे पूर्ण करावीत, अन्यथा त्यांना रकमेपासून वंचित राहावे लागू शकते.याशिवाय, जर फॉर्म भरताना नाव, पत्ता, आधार क्रमांक किंवा बँक क्रमांक इत्यादी काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करा अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही.

कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळत लाभ?

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना लाभ दिला जाणार नाही आणि त्यांना पात्र मानले जाणार नाही.
जर कोणताही शेतकरी अपात्र असेल आणि त्याने लाभ घेतला असेल, तर सरकार त्याच्याकडून रक्कम वसूल करेल आणि त्याला सरकारकडून 
हप्त्या म्हणून घेतलेले सर्व पैसे परत करावे लागतील.जर तुमच्याकडे संस्थात्मक जमीन असेल तर तुम्हाला पैसे परत करावे लागतील.संवैधानिक 
पदांवर असलेले किंवा त्यांनी भूषवलेले लोक या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि 
आर्किटेक्ट असे व्यावसायिक जे सराव करून आपला व्यवसाय पुढे चालवत आहेत, अशा व्यक्तींना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत आपण अधिक माहिती मिळवू शकता, तसेच हप्त्याबाबत ही माहिती मिळेल.
 

About Author

Rohit Shinde

Other Latest News