भोपाळ : जगामध्ये सर्वात चांगले रस्त्यांचे जाळे कुठले असेल तर ते अमेरिकेचे. मात्र, येणाऱ्या दोन वर्षांमध्ये अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा देखील चांगले रस्त्यांचे जाळे मध्य प्रदेशामध्ये उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ते मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बदनावर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना टाळ्या वाजवत गडकरी यांचे अभिवादन केले.
मध्य प्रदेशातील विविध राष्ट्रीय महार्गांच्या योजनेंचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. नितीन गडकरी म्हणाले, मी फक्त बोलणारा नेते नाही. जो बोलते ते करतो. डंके की चोटपर मी बोलत असतो.

5800 कोटींचा निधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज धार जिल्ह्यातील बदनावर येथे मध्य प्रदेशच्या 10 रस्ते योजनेसाठी निधी दिला. तब्बल 5800 कोटींच्या निधीद्वारे तब्बल 328 किलोमीटरचा 10 रस्त्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, मध्य प्रदेशच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्रम मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मी राज्याच्या जनतेच्या वतीने आभार मानतो.
पायाभूत सुविधांसाठी तीन लाख कोटी
नितीन गडकरी म्हणाले, मध्य प्रदेशात एका वर्षात तीन लाख कोटी रुपयांचा निधी खर्च करत पायाभूत सुविधा निर्माण केली जाईल. त्यामध्ये दिल्ली-मुंबईला या पायाभूत सुविधा जोडल्याने येथे इंडस्ट्रीयल क्लस्टर बनेल आणि रोजगार निर्माण होईल. येणाऱ्या दोन वर्षात मध्य प्रदेशमध्ये रस्त्यांचे जाळे हे अमेरिकेपेक्षा चांगले असेल, असा मी तुम्हाला विश्वास देतो.
मी हवेत गोष्टी बोलत नाही…
नितीन गडकरी म्हणाले, मी हवेत गोष्टी बोलत नाही. मी केलेल्या घोषणा हवेत विरून जात नाहीत. फालतू घोषणा करणारा मी नेता नाही. जी गोष्टी बोलतो ते डंके की चोटपर बोलतो. गडकरी यांच्या या वाक्यानंतर मुख्यमंत्री नितीन गडकरीसह समारंभाला उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून नितीन गडकरी यांना अभिवादन केले.