धनंजय मुंडेंना अर्धांगवायु? स्वत:च दिली आजाराची माहिती

मुंबई : धनंजय मुंडे हे एका कार्यक्रमासाठी बीडला जाणार होते मात्र त्या कार्यक्रमाला ते गैरहजर राहिले. त्याविषयी नांदेडमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, धनंजय मुंडें यांना अर्धांगवायूचा झटका आला असून त्यांचे डोळे वाकडे झाले आहेत त्यांना बोलता येत नाही.

बाबासाहेब पाटलांच्या दाव्यानंतर अनेकांना धनंजय मुंडे यांची विचारपूस करण्यासाठी संपर्क साधला असता खरे काय ते समोर आले. याविषयी धनंजय मुंडे यांनी ट्विट करत स्वतःच माहिती दिली.

धनंजय मुंडे म्हणाले, आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.

अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी

बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

काय आहे बेल्स पाल्सी?

बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याच्या एका बाजुला अशक्तपणा येतो. यामुळे चेहरा वाकडा होतो. हा आजार काही महिन्यात किंवा आठवड्यातही बरा होतो. बेल्स पाल्सीमध्ये डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे डोळ्याची विशेष काळजी घ्यावी लागते.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News