नवी दिल्ली: आज 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे अर्थात जागतिक आरोग्य दिन. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे, याच आरोग्यदिनाच औचित्य साधत केंद्रीय मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांनी सर्वांना मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी आरोग्यपूर्ण आणि आनंददायी जीवन कसे जगायचे, याचा रोडमॅपच अगदी थोडक्यात सांगितलाय….आजच्या काळात स्पर्धेच्या युगात धावपळीमुळे आरोग्य धोक्यात आलंय, जीवनातील सुख आणि शांती नष्ट होत चाललीयं….अशा परिस्थितीत सिंधियांचा हा सल्ला आपणास मोलाचा ठरू शकतो,
काय म्हटले सिंधिया?
आरोग्याला पहिले प्राधान्य
जागतिक आरोग्य दिन एका दिवसापुरता मर्यादीत न राहता खऱ्या अर्थाने रोज आपण आरोग्य दिन पाळला पाहिजे. दैनंदिन जीव जगत असताना आपण सर्व गोष्टींपोक्षा आरोग्याला पहिले प्राधान्य द्यायला हवे. काम, शिक्षण या गोष्टी महत्वाच्या आहेतच मात्र यापेक्षा महत्वाचं आरोग्य आहे. आरोग्याचा समतोल साधत आपण पुढे वाटचाल केली पाहिजे

This #WorldHealthDay, sharing with you the keys to a healthy and happy life. pic.twitter.com/yrE0X3PLpD
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) April 7, 2025
व्यायाम करा
आयुष्य जगत असताना शरीराची सुदृढता अत्यंत महत्वाची आहे. आपल्या व्यस्त दिनचर्येतून आपण सातत्याने वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. यासाठी आपण आपले स्वत:चे रूटीन बनवून ते फॉलो केले पाहिजे…
संगीत ऐका
संगीत नेहमीच माणसाच्या मनाला उभारी देते, पिचलेल्या…खचलेल्या लोकांना संगीत ऐकल्याने हायसे वाटते. नव्याने ऊर्जा मिळते. माणूस नव्या ताकदीने कामाला लागतो. अशावेळी संगीत दिवसातून एकदातरी ऐकण्याचा सल्ला सिंधिया यांनी दिलाय….भारतात ही पद्धती जुन्या काळापासून अस्तित्वात आहे.
चांगले अन्न खा
“माणूस जे खातो तसा माणूस घडतो, ” आपण नेहमीच चांगेल आणि आरोग्यादायी अन्न खाण्यावर जोर दिला पाहिजे. फळभाज्या, पालेभाज्यांचा वापर करत सकस अन्न खावे.
संकटांचा सामना
21 व्या शतकात स्पर्धा प्रचंड वाढली आहे अशा परिस्थितीत आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा, समस्यांचा सामना करावा लागतो. या संकटांची विभागणी करून संयमाने त्याच्यावर मात केली जावू शकते. कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता त्याला धीराने सामोरे गेल्यास आयुष्यात बदल घडू शकतो.