नवी दिल्ली: दरवर्षीप्रमाणे, यावेळीही पुढील महिन्यापासून श्री केदारनाथ धामची यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेत यात्रेकरू सोयीसाठी हेलिकॉप्टरने प्रवास करत असतात. आता या हेलिकॉप्टर तिकीटांची ऑनलाईन विक्री 8 एप्रिलपासून सुरू झालेली आहे.
यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टरची सुविधा
यावेळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे 2 मे 2025 रोजी सकाळी 7 वाजता उघडतील. केदारनाथ मंदिरात पोहोचण्यासाठी गौरीकुंड नंतर ट्रेक करावे लागते; यामध्ये तुम्ही पायी जाऊ शकता, पालखी किंवा खेचरावर स्वार होऊ शकता किंवा हेलिकॉप्टर सेवेद्वारे कमी वेळात धाममध्ये पोहोचू शकता.जर तुम्ही हेलिकॉप्टरने धामला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ते आगाऊ बुक करावे लागेल. केदारनाथसाठी हेलिकॉप्टर सेवेच्या ऑनलाइन बुकिंगबद्दल आम्ही तुम्हाला येथे सविस्तर सांगत आहोत…

श्री केदारनाथ धामच्या प्रवासादरम्यान, भाविक त्यांच्या वाहनाने गौरीकुंडला पोहोचू शकतात आणि त्यानंतर त्यांना 16 किलोमीटरचा ट्रेकिंग करावा लागतो. रस्त्याने जाण्यासाठी हे शेवटचे ठिकाण आहे, त्याशिवाय तुम्ही हेलिकॉप्टरने मंदिराच्या अगदी जवळ पोहोचू शकता. केदारनाथ तसेच बद्रीनाथच्या यात्रेसाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करू शकता. केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टर तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग 8 एप्रिल 2025रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाले आहे, सुरुवातीच्या प्रवासाच्या तारखा 2 मे ते 31 मे पर्यंत असतील.
हेलिकॉप्टर तिकिटे कुठे बुक करायची?
जर तुम्ही हेलिकॉप्टरने श्री केदारनाथ धामला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या हेली ट्रॅव्हल वेबसाइटवरून बुकिंग करू शकता. या वर्षी हेलिकॉप्टर ऑपरेशन्स रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गुप्तकाशी, सिरसी आणि फाटा येथील हेलिपॅडवरून सेवा प्रदान करतील.
भाडे किती असेल?
यावर्षी हेलिकॉप्टर सेवेचे भाडे वाढल्याचे सांगण्यात येत आहे. सिरसी ते केदारनाथ भाडे रुपये, फाटा ते केदारनाथ ६,०६३ रुपये आणि गुप्तकाशी ते केदारनाथ 8533 रुपये निश्चित करण्यात आले आहे.