पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिलं असून असं म्हटलं आहे की, भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, त्यामुळे त्यांना नोबेल मिळालाच पाहिजे.
पहलगाम हल्ल्यानंतर संघर्ष थांबवण्यात ट्रम्प यांची मध्यस्थी?

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा संघर्ष वाढत असतानाच, पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली होती. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायरवर सहमती साधण्यासाठी मध्यस्थी केल्याचं दावा असीम मुनीर यांनी केला आहे. यासंदर्भात ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही पोस्ट केली होती. मात्र, भारताने आजवर ट्रम्प यांच्या कोणत्याही मध्यस्थीच्या दाव्यांना नकार दिला आहे.
ट्रंप यांना यापूर्वीही मिळालं होतं नोबेल नामांकन
साल 2020 मध्येही ट्रंप यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. नॉर्वेच्या एका खासदाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात दरम्यान झालेल्या ऐतिहासिक शांती करारात ट्रम्प यांच्या भूमिकेसाठी त्यांना नामांकित केलं होतं. मात्र, त्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला नव्हता. जर ट्रम्प यांना नोबेल मिळालं, तर ते अमेरिकेचे पाचवे राष्ट्राध्यक्ष असतील ज्यांना हा सन्मान मिळेल.
ट्रम्प नोबेलबाबत उत्साही
अलीकडे ट्रंप यांनी स्वतःच असं म्हटलं होतं की, “जर युद्ध थांबत असेल, तर मला नोबेल शांतता पुरस्कार दिला जाऊ शकतो.” त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र त्यात अपयश आलं होतं. आता ते मिडल ईस्टमधील संघर्ष थांबवण्याचाही प्रयत्न करत आहेत.
नोबेल पुरस्काराचे नियम काय सांगतात?
नोबेल शांतता पुरस्कार दरवर्षी शांती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औषधशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. कोणीही स्वतःहून अर्ज करू शकत नाही, तर निवडक नामनिर्देशकच अर्ज करतात. नोबेल शांतता पुरस्काराचा निर्णय नॉर्वेजियन नोबेल कमिटी घेते. त्यामुळे ट्रंप यांना नोबेल मिळणार का नाही हे येणारा काळच ठरवेल.