IPL MI vs RCB : मुंबई विरूद्ध बंगळूरू सामना, कुणाचं पारडं जड, कोण जिंकेल?

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळूरू संघात आज वानखेडे स्टेडियमवर महत्वपूर्ण सामना खेळला जात आहे.

मुंबई: वानखेडे स्टेडीयमवर आज आयपीएलमधील एक हायव्होल्टेज सामना रंगणार आहे, यामध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू हे संघ आमने सामने असतील. आयपीएलमध्ये आजवर मुंबई आणि बंगळूरू या संघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला आहे. तसेच चित्र आजही पाहायला मिळू शकते.

कुणाचं पारडं जड?

2025 चा आयपीएल हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघासाठी आतापर्यंत चांगला राहिला आहे. रजत पाटीदार उत्तम कॅप्टन म्हणून कामगिरी बजावतोय. तर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील चांगलाच फॉर्मात आहे. संघातील सर्व गोलंदाजांचीही उत्तम साथ मिळताना दिसत आहे. आरसीबीने आतापर्यंत तीन सामने खेळले असून पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत गुणतालिकेत तिसरं स्थान कायम ठेवलंय.

दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत हा सिझन तितका फायदेशीर ठरलेला नाही. मुंबईच्या संघाने आजवर खेळलेल्या 4 पैकी अवघ्या एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. संघातील एकीचे दर्शन आणि ताळमेळ बिघडल्याचं चित्र आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ सध्या 8 व्या स्थानावर पाहायला मिळत आहे. आजवरचे आयपीएल इतिहासातले सामने आकडेवारी पाहिली असता बंगळूरूचा संघ काही प्रमाणात मुंबई इंडियन्सवर वरचढ ठरल्याचं चित्र आजवर पाहायला मिळालं आहे. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मागील 6 सामन्यांत आरसीबीने 4 तर मुंबई इंडियन्सने अवघे दोन सामने जिंकले आहेत.

या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष:

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दीक पांड्यावर विशेष जबाबदारी असेल, त्याचबरोबर फलंदाजीची धुरा रोहित शर्मा, हार्दीक पांड्या, सुर्यकुमार यादव, मिशेल सॅंटनर यांच्यावर असणार आहे. तर गोलंदाजीत दीपक चहर, जसप्रीत बुमरा, करण शर्मा यांच्यावर प्रामुख्याने महत्वाची जबाबदारी असणार आहे,

बंगळूरूचा संघ सध्या चांगल्या लयीत पाहायला मिळत आहे. कर्णसाधार रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडीकल, टीम डेविड यांची जबाबदारी फलंदाजीत मोठी असणार आहे. दुसरीकडे आरसीबीचे गोलंदाज जॉस हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, फिव सॉल्ट यांची गोलंदाजीतील भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे,

सामना मुंबईत होत आहे, याचा फायदा मुंबई संघाला काही प्रमाणात होवू शकतो, असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे. तसेच आयपीएल रसिकांमध्ये हा सामना मुंबई जिंकेल, असा अंदाज पाहायला मिळतोय, हे अंदाज मोडीत काढल हे रॉयल चॅलेज स्विकारायला आरसीबी देखील तयार आहे. मुंबई कमबॅक करणार की आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवणार, हे आज समजेल

 

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News