खबर पक्की! यंदा मान्सून धुव्वाधार; 105 टक्के पावसाची शक्यता, आयएमडीचा अंदाज

मान्सूच्या अंदाजावर शेतकऱ्यांच्या पेरण्या करण्याचे ठरत असते. महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून धडकण्याची शक्यता आहे. त्यामुले मेच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांचे पेरणीचे काम पूर्ण झालेले असेल.

मुंबई :  यंदाचा मान्सून कसा असणार याचा आंदज आयएमडीने वर्तवला आहे. 1 जानेवारीला मान्सूनचे आगमन केरळच्या किनाऱ्यावर होणार आहे. यंदाचा मान्सून हा धुव्वाधार असून पूर्ण हंगामात 105 टक्के पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

105 टक्के पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त असतो. दक्षिण भारतात, महाराष्ट्रात देखील पाऊस सरासरी पेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मात्र, एक जूनला केरळच्या किनाऱ्यावर येणार मान्सून आठ दिवसांत मुंबईत धडकेल.

मान्सून हंगामात प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर न्यट्रल स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यातच एल निनोचा देखीलल प्रभाव नसणार आहे. त्यामुळे यंदाचा मान्सून सुखकारक असेल.

दुसऱ्या टप्प्यात जोरदार

एननिनो प्रभावी नसल्यामुळे मान्सून चांगला असल्याचे वर्तवण्यात येत आहे. जून महिन्यात जर मान्सूचे आगमन होत असले तरी पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाची सरासरी वाढेल. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात पावसाची सरासरी कमी राहण्याची देखील शक्यता आहे.

पेरण्या वेळेवर होणार

मान्सूच्या अंदाजावर शेतकऱ्यांच्या पेरण्या करण्याचे ठरत असते. महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांचे पेरणीचे काम पूर्ण झालेले असेल. यंदांचा मान्सून हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News