प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा त्यांच्या स्फोटक आणि धडकी भरविणाऱ्या भविष्यवाणीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेक भाकीत वर्तुवून ठेवली आहेत. बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाबाबत एक धक्कादायक भाकीत वर्तवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 2025 हे असे वर्ष असणार आहे, जे सर्वांसाठी अत्यंत कठीण असेल. या काळात जगावर एक मोठे संकट असेल, बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, यावर्षी जागतिक बाजारात अनेक धोरणं बिघडतील. त्यामुळे जगातील अनेक देशांत तणाव वाढेल. जगात मोठी उलथापालथ होईल. सध्याचा विचार करता अमेरिकेच्या धोरणांचा थेट परिणाम दिसून येत आहे.
जगावर आर्थिक मंदीचं संकट?
सध्या जगभरातील आर्थिक बाजारात मोठी उलथापालथ दिसून येत आहे. त्याला बाबा वेंगाच्या भाकिताशी जोडून पाहण्यात येत आहे. असे मानण्यात येत आहे की, 2025 मध्ये जगभरात आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक बड्या बँकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. अनेक देशांना गंभीर आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल. काही देशात महागाईचा विस्फोट होईल आणि ते शेजारील देशात आश्रयाला जातील. त्यामुळे त्या देशावर सुद्धा आर्थिक ताण येईल. यातून गरजांसाठी माणूस वापरला जाईल. माणसाच्या पतनास या वर्षापासून सुरुवात होणार असल्याचे भाकीत बाबा वेंगाने केले आहे. जगभरातील काही देशांचं धोरणात्मक गणित बिघडण्याची शक्यता आहे.

कोण होत्या बाबा वेंगा?
बाबा वेंगा ह्या बल्गेरिया देशातील एक प्रसिद्ध अंध भविष्यवक्ता होत्या. त्यांचा जन्म १९११ मध्ये झाला आणि १९९६ मध्ये त्यांचे निधन झाले. लहानपणीच एका वादळात त्यांना दृष्टिदान गमवावे लागले. त्यानंतर त्यांना भविष्यकथनाची अद्भुत शक्ती प्राप्त झाली, असे मानले जाते. त्यांनी अनेक ऐतिहासिक घटना आणि नैसर्गिक आपत्तींची अचूक भाकिते केली होती. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या भविष्यवाण्यांवर मोठा विश्वास ठेवला. आजही अनेक लोक त्यांच्या भाकितांचा अभ्यास करतात आणि त्यातून प्रेरणा घेतात. बाबा वेंगाचे भविष्यकथन हे अनेक वेळा आश्चर्यकारक रित्या सत्य ठरले आहे, त्यामुळे त्यांना जागतिक ख्याती प्राप्त झाली.