भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा नंतर आता गुजरातमध्ये कोरोनाचे आणखी १५ नवीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमधील अहमदाबादमधून कोरोनाची नवी प्रकरणे समोर आली आहेत.
गुजरातमधील कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाचा JN.1 प्रकार आढळून आला आहे. १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा प्रकार ओमिक्रॉन प्रकारचा असल्याचे सांगितले जात आहे. ओमिक्रॉन प्रकार पहिल्यांदा ऑगस्ट २०२३ मध्ये दिसून आला होता.

रुग्णांवर उपचार सुरू
त्याच वेळी, आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना आश्वासन दिले आहे, की घाबरून जाण्याची गरज नाही. कारण सर्व रुग्ण रुग्णालयात दाखल न होता घरीच बरे होत आहेत.
‘काळजी करण्याची गरज नाही‘
गुजरातच्या अतिरिक्त संचालक (सार्वजनिक आरोग्य) डॉ. नीलम पटेल यांनीही या प्रकरणी निवेदन दिले आहे. ते म्हणाले, सध्या गुजरात किंवा भारतासाठी ही प्रकरणे फारशी चिंतेची बाब नाहीत. ओडिशाबद्दल बोलायचे झाले तर, कोविड-१९ चा एक नवीन रुग्ण आढळला आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
केरळमध्ये कोरोनाचे १८२ रुग्ण
केरळमध्ये कोरोनाचे १८२ रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे २६ नवीन रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३२ झाली आहे.
दिल्लीत कोरोनाचे ५ नवीन रुग्ण आढळले, तर गुरुग्राममध्ये २ रुग्ण आढळले. हरियाणामधून ४ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.
देशात एकूण किती रुग्ण?
चीन, थायलंड, सिंगापूर आणि हाँगकाँग सारख्या आशियाई देशांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे, हाँगकाँगमध्ये अलीकडेच ३० हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात सध्या २५७ सक्रिय कोविड रुग्ण आहेत.