काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ निष्पाप पर्यटकांचा हकनाक बळी गेला. मौज-मजा करायला गेलेल्या पर्यटकांवर बेछूटपणे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. अखेर ६ मेच्या मध्यरात्री भारताने आपल्या निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे.
ऑपरेशन सिंदूर फत्ते
ऑपरेशन सिंदूर फत्ते करीत भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे. रात्री उशीरा भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली. येथूनच पाकने भारतीय हल्ल्याचा कट रचल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत १२ हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचीही माहिती आहे.

Justice is Served.
Jai Hind! pic.twitter.com/Aruatj6OfA
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
पाकच्या नाड्या आवळणार…
यापूर्वीही भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देत पाकिस्तानात वॉटर स्ट्राइक केला आहे.