दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कन्या हर्षिता या आज (गुरुवारी) लग्नबंधनात अडकल्या. संभव जैनसोबत त्यांचा विवाह झाला. या विवाह सोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह आपचे माजी मंत्री, आमदार उपस्थित होते.
दिल्लीमधील पंचतारांकीत हाॅटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार हर्षिता केजरीवाल आणि संभव जैन यांचा रिसेप्शन सोहळा २० एप्रिलला होणार आहे. लग्न समारंभातील मेहींदच्या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल, सुनिता केजरीवाल हे डान्स करत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. अरविंद केजरीवाल यांची दोन मुलं असून मुलाचे नाव पुलकित आणि मुलीचे नाव हर्षिता असे आहे.

हर्षिता-संभव एकमेकांच्या परिचयाचे
हर्षित जैन हिने दिल्ली आयआयटीमधून शिक्षण घेतले आहे. संभव आणि हर्षित हे आधीपासूनच एकमेकांच्या परिचयाचे आहेत.त्यांचा साखपूरडा कौटुंबीक व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये झाला होता.या सोहळ्यासाठी कौटुंबीक लोक तसेच अरविंद केजरीवाल यांच्या जवळील काही व्यक्ती यांना वगळता कोणाला निमंत्रण नव्हते
काय करतो संभव जैन?
अरविंद केजरीवाल यांचे जावई संभव जैन हे खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत. काही महिन्यांपूर्वी हर्षिता आणि संभव यांनी मिळून स्टार्टअप कंपनी देखील सुरू केली आहे. हर्षिता यांच्यासोबत संभव याची आधीच ओळख होती. हर्षिता हिचे शिक्षण दिल्लीमधील शाळेत झाले त्यानंतर तीने 2014 आयआयटीची परीक्षा पास होत दिल्ली आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला. हर्षिताने केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.