UPI PAYMENT: ऑनलाईन व्यवहार वाढले, आश्चर्यकारक आकडे समोर…

युपीआयद्वारे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्याची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

मुंबई: ऑनलाईन युपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांची संख्या देशामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे, देशातील युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआयद्वारे पेमेंटला सार्वनजिक रूप आले आहे, त्यांची स्विकारार्हता वाढली आहे. गत आर्थिक वर्षांच्या सहामाहीत युपीआय व्यवहारांचे प्रमाण 42 टक्क्यांनी वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. हे व्यवहार 92.23 अब्जांवर पोहोचले आहेत. इंडिया डिजिटल पेमेंट्सच्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

फोन पे, गुगल पे सर्वाधिक वापरले जाणारे युपीआय प्लॅटफॉर्म्स असल्याचं समोर आलं आहे.

UPI मर्यादा वाढणार

 

RBI नं जाहीर केलं की, UPI च्या व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) व्यवहारांसाठी लवकरच मर्यादा सुधारित केल्या जातील. व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) व्यवहारांची मर्यादा मात्र 1 लाखावर रुपयावर कायम राहील. सध्या UPI ची मर्यादा P2P आणि P2M दोन्हीसाठी 1₹ लाख आहे, परंतु काही विशिष्ट P2M पेमेंट्ससाठी मर्यादा 2₹ लाख ते 5₹ लाखापर्यंत आहे. वापरकर्त्यांच्या नवीन गरजांनुसार ही मर्यादा ठरविण्यासाठी NPCI ला बँका आणि UPI परिसंस्थेतील भागधारकांशी चर्चा करून बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल, असं RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 9 एप्रिल 2025 रोजी सांगितलं.

युपीआयच्या माध्यमातून महिन्याला 16 अब्ज व्यवहार

 

द डिजिटल फिफ्थचे संस्थापक आणि सीईओ समीर सिंग जैन म्हणाले, “यूपीआय दरमहा 16 अब्ज व्यवहार हाताळते आणि 2030 च्या अखेरीस ते 3 पट वाढण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत मजबूत पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनते.” त्यांनी पुढे सांगितले की, रिअल-टाइम फसवणूक शोधणे, क्लाउड-नेटिव्ह आर्किटेक्चर आणि स्केलेबल, ड्युअल-कोर स्विच आता पर्यायी राहिलेले नाहीत तर सुरक्षित आणि अपयशी ठरू शकणारे डिजिटल पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी ते आवश्यक आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News