सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीचा विचार? हॅकर्सकडून 1.95 कोटींच्या गोल्डची परस्पर विक्री

सोन्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होते. काहीजण दागिने, नाणे खरेदी करतात मात्र, हे सुरक्षित ठेवणे थोडे कठीण असते. दागिने चोरी होण्याची भीती असते त्यामुळे गुंतवणुकदार हे डिजिटल सोन्याला प्राधान्य देत आहेत. मात्र, आता डिजिटल गोल्डवरच डल्ला मारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून डिजि गोल्डकडे बघत असाल तर थांबा, कारण हॅकर्सनी 1.95 कोटींच्या डिजिटल गोल्डची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिजिटल गोल्ड हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. मात्र, आता हॅकर्सने चक्क डिजिटल गोल्डवरच डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

1.95 कोटींचा परस्पर विक्रीचा व्यवहार

हॅकर्सनी आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेड (एबीसीडी) अॅप हॅक करुन 435 ग्राहकांच्या खात्यांमधून सुमारे 1.95 कोटी रुपयांचे डिजिटल सोने बेकायदेशीरपणे विकले आहे. ही घटना मुंबईतील प्रभादेवी परिसरात उघडकीस आली, जेव्हा अनेक ग्राहकांनी तक्रार केल्या की त्यांच्या डिजिटल सोन्याच्या होल्डिंग्ज त्यांच्या माहितीशिवाय आणि परवानगीशिवाय विकल्या गेल्या. काही ग्राहकांनी याबाबत सोशल मीडियाद्वारेही नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे.

आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेड (एबीसीडी) अॅपमध्ये एका हॅकरने हॅकिंग करुन 435 ग्राहकांच्या खात्यांमधून सुमारे 1.95 कोटी रुपयांचे डिजिटल सोन्याची विक्री केली आहे. सायबर फसवणुकीची ही घटना मुंबईतील प्रभादेवी परिसरात घडली. अनेक ग्राहकांनी कंपनीच्या कॉल सेंटरशी संपर्क साधून त्यांच्या डिजिटल सोन्याच्या होल्डिंग्जची संमतीशिवाय विक्री झाल्याचे कळवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक; काळजी घ्या!

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, विश्वासार्ह आणि रेग्युलेटेड प्लॅटफॉर्मचाच वापर करा. आकर्षक ऑफर्समागे न पडता प्लॅटफॉर्मचा इतिहास, ग्राहक अनुभव आणि सुरक्षा प्रणाली तपासा. डिजिटल गोल्डवर कोणतेही सरकारी नियंत्रण नसल्यामुळे फसवणुकीची शक्यता अधिक असते. तसेच, तुमची गुंतवणूक किती सुरक्षित आहे, ती कुठे संग्रहित केली जाते, याची स्पष्ट माहिती घ्या. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शारीरिक सोने किंवा सरकारी योजनेतील गुंतवणूक जास्त सुरक्षित मानली जाते. डिजिटल गोल्ड फक्त लघुकाळासाठी किंवा सहज व्यवहारासाठी योग्य आहे. योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या. सतर्क राहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा.


About Author

Rohit Shinde

Other Latest News