मुंबई : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झालेला आहे. जागतिक शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजारात सोमवारी 4 टक्के घसरण पाहायला मिळालीय. तर या वर्षभरात शेअर बाजारात आत्तापर्यंत 8 टक्के घसरण झालीय. बाजार कोसळत असल्यानं अनेक गुंतवणुकदारांत भीतीचं वातावरण आहे. बाजारात विक्रीची लाट उसळण्याची शक्यता आहे.
घाबरून जाऊ नका…
या स्थितीत गुंतवणूकदारांनी घाबरुन न जाता योग्य पावलं उचलण्याची गरज आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यातून भविष्यात लाभ होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजारात व्यवहार करताना काय काळजी घ्याल?
1. शांत राहा, घाबरुन जाऊ नका
शेअर बाजारात पडझड होत असली तरी घाबरुन जाऊ नका, भावनिक निर्णय घेऊ नका. बाजारात दर पडलेले असताना शेअर्सची विक्री केलीत तर तोटा होण्याची शक्यता आहे. यापेक्षा शेअर्स होल्ड करा. भविष्यात रिकव्हरीतून तोटा कमी होण्याची किंवा फायद्याची शक्यता नाकारता येणार नाही.
2. मजबूत कंपन्यांत गुंतवणूक करा
ज्या कंपन्या चांगल्या आहेत. ज्यांच्या बॅलन्स शीट, नफा, व्यवस्थान चांगलं आहे. नावाजलेल्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांत गुंतवणूक करा.
3. एसआयपी सुरु करा किंवा वाढवा
सध्या बाजारात अनिश्चितता असेल तर एसआयपीत अधिक गुंतवणूक करणं फायद्याचं ठरु शकतं. बाजारात सध्या सरासरी किमती या कमी पातळीवर आहे. एसआयपीत गुंतवणूक फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. बाजार रिकव्हर झाल्यानंतर त्यातून चांगले रिटर्न्स मिळतील.
4. रिस्क मॅनेजमेंट गरजेची
शेअर बाजारात व्यवहार करताना स्टॉ-लॉस सेट करा. दीर्घ गुंतवणुकीचा विचार करा, इक्विटी, डेट आणि गोल्डवर जास्त फोकस करण्याची गरज आहे.
5. स्वस्त शेअर्सपासून सावध राहा
कमकुवत कंपन्यांचे शेअर्स कमी पैशांत मिळत असतील तर भुलून ते खरेदी करु नका. शेअर बाजाराच्या पडझडीत सर्वाधिक फटका अशा कंपन्यांना बसतो. त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनी पाहून शेअर्स घ्या
6. दीर्घ कालावधीची तयारी ठेवा
शॉर्ट टर्ममध्ये होणारं नुकसान लक्षात घेता दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा. ३ ते ५ वर्षांचं लक्ष्य ठेवा. बाजार आत्ता पडला तरी तो नंतर रिकव्हर होणार हे लक्षात ठेवून गुंतवणूक करा.
(वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. MP मराठी ब्रेकिंग याचा दावा करीत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)