पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर

राजधानी दिल्लीच्या तुलनेत मुंबई, पुण्यात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबई: पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये देशभरात अगदी किंचित बदल बघायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रती लिटर 94.77 रूपये तर डिझेल प्रती लिटर 87.67 रूपये आहे. त्या तुलनेने राज्यातील मुंबई, पुणे आणि अन्य महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेल महागल्याचे चित्र आहे. कारण, मुंबईत पेट्रोल 103.50 रूपये प्रति लिटर तर डिझेल 90.03 रूपये दराने मिळत आहे.

पुण्यात पेट्रोल- डिझेल महाग:

राजधानी दिल्ली, मुंबई या शहरांशी तुलना करता सध्या पुण्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर चांगलेच वाढले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 104.12 रूपये तर डिझेल 90.65 रूपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना पेट्रोल डिझेलसाठी राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

 देशभरातील प्रमुख शहरांत काय दर ?

कोलकाता –  पेट्रोल: 105.01  डिझेल: 91.82

चेन्नई –  पेट्रोल: 100.93    डिझेल: 92.52

बंगळूरू- पेट्रोल: 102.92  डिझेल: 90.99

चंदीगढ – पेट्रोल: 94.30  डिझेल: 82.45

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.

तेल विपणन कंपन्या (OMCs) दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुधारतात, जे जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि चलन विनिमय दरांमधील चढउतार प्रतिबिंबित करतात. हे नियमित अपडेट पारदर्शकता सुनिश्चित करतात आणि ग्राहकांना सर्वात अचूक आणि अद्ययावत इंधन किमतीची माहिती प्रदान करतात.

 

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News