GOLD SILVER RATE: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट, दर वाढणार की कमी होणार?

सोने-चांदीच्या दरातील घसरणीचा आलेख कायम आहे. तुमच्या शहरातील आजचा बाजारभाव जाणून घ्या सविस्तर...

Gold Silver Rate 10th April 2025: एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून सोने- चांदीच्या दरात चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश भागात आज सोने प्रतितोळा (10 ग्रॅम) 93 हजार तर चांदी किलोमागे 95 हजार रूपयांच्या आसपास असल्याचं चित्र आहे. सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात 2940 प्रति तोळा तर चांदीच्या दरात 2000 रूपये प्रतिकिलो अशी वाढ झाली आहे.

सराफा बाजारातून आज सोने चांदीच्या दरांबाबत जी अपडेट समोर आलीयं, त्यानूसूरा (Gold Silver Price Today)  10 एप्रिल 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate Today)  85,750 तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 93, 530  रूपये 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत  70,160 रुपये इतकी आहे. तर 1 किलो चांदीची किंमत देशातील बहुंताश प्रमुख शहरात  95,000 च्या आसपास आहे.

महावीर जयंतीला सोनं खरेदीचा विचार? जाणून घ्या दर

 

18 कॅरेट सोन्याचे आजचे दर

दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Rate Today) 70,160/- रूपये इतकी आहे.
कोलकाता आणि मुंबई सराफा बाजारात दर 70, 040/- रूपये आहे.
इंदौर आणि भोपालमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 67, 880 आहे.
चेन्नईच्या सराफा बाजारात 70, 900/-  रूपयांवर दर पोहोचला आहे.

22 कॅरेट सोन्याचे आजचे दर

भोपाल, इंदौर, पुणे या शहरांत (Gold Rate Today) 82, 960/- इतका 22 कॅरेटचा दर आहे.
जयपुर, लखनऊ, दिल्लीच्या सराफा बाजारात आज 10 ग्रॅमची किंमत 85, 750/- इतकी आहे.
मुंबई, हैदराबाद, केरळच्या सराफा बाजारांमध्ये हा दर 85, 600/-  वर पोहोचलाय.

24 कॅरेट सोन्याचा दर

भोपाळ, इंदौर, पुणे आदी शहरांत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 90, 500  इतकी आहे.
दिल्ली, लखनऊ, चंदीगढच्या बाजारात आज 10 ग्रॅम शुद्ध सोन्याची किंमत 93, 530/- रूपये इतकी आहे.
हैदराबाद, केरळ, बंगळूरू, मुंबई त्या सराफा मार्केटमध्ये 93, 380/-  इतका दर आहे.
चैन्नईच्या सराफा बाजारामध्ये 93, 380/-इतका दर आहे.

जयपूर, कोलकाता, अहमदाबादच्या मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 95, 000 /- आहे.
दक्षिण भारतातील चैन्नई, मदुराई, हैदराबादच्या सराफा बाजारांत 1,04,000/- रुपये दर आहे.
भोपाळ, इंदौरमध्ये एक किलो चांदीची किंमत 92,900/  आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?

ISO (Indian Standard Organization) द्वारे सोन्याची शुद्धता समजण्यासाठी हॉलमार्क दिले जातात.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते, तर 22 कॅरेट सोने 91 टक्के शुद्ध असते.
24 कॅरेट सोन्यामध्ये 1.O (24/24 = 1.00) एवढी शुद्धता असावी लागते.
22 कॅरेट सोन्यामध्ये 9 टक्के इतर धातू वापरले जातात,  तांबे, चांदी, झिंक याचा वापर केला जातो.
22 कॅरेट सोने 0.916 (22/24 = 0.916) इतके शुद्ध असावे लागते.
24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर 999 तर  23 कॅरेटच्या दागिन्यावर 958, 22 कॅरेटवर 916 असे लिहिले जाते. 21 कॅरेटवर 875 तर 18 कॅरेटवर 750 लिहिले जाते.
24 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये कोणतेही धातू मिसळले जात नाहीत. याचे बिस्कीटं तसेच सोन्याची नाणी मिळतात. परंतु 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दागिने बनविले जाणे अवघड आहे…परिणामी दुकानदार 22, 20 अथवा 18 कॅरेटचे दागिने बनवतात.

नोट- वर देण्यात आलेले सोने- चांदीचे दर सांकेतिक स्वरूपात आहेत. यामध्ये जीएसटी तसेच मेकींग चार्जेसचा समावेश केलेला नाही. योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्या नजीकच्या सराफा व्यापाऱ्यांशी संपर्क करा.


About Author

Rohit Shinde

Other Latest News