Gold Silver: सोनं 55 हजारांपर्यंत घसरणार, तज्ज्ञांचा दावा; लग्नसराईत दिलासा मिळणार?

लाखाच्या उंबरठ्यावरील सोने 55 हजारांपर्यंत घसरण्याची शक्यता, अमेरीकन तज्ज्ञांच्या दाव्याने सराफा बाजारात खळबळ...तर लग्नसराईत भारतीयांना दिलासा मिळण्याची शक्यता

मुंबई: मागील काही दिवसांत सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने गुंतवणूकदारांत आनंदाच वातावरण पाहायला मिळत आहे.परंतु, दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र ही चिंतेची बाब ठरली आहे. मात्र आता काही सराफा बाजार विश्लेषक तज्ज्ञांच्या मते आगामी काळात सोन्याच्या दरांत मोठी घसरण पाहायला मिळू शकते. यामुळे रिटेल खरेदीदारांची चांदी होणार आहे.

सोनं 55 हजारांवर घसरणार?

काही अंदाजांनुसार सोनं 38 टक्के म्हणजेच 55 हजार रूपयांपर्यंत खाली घसरू शकते, असा अंदाज आहे. भारतीय बाजाराचा विचार केला तर, ही बाब सामान्य ग्राहकांसाठी फायद्याची ठरू शकते. यामुळे जागतिक गुंतवणूक धोरण बदलून जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांवर आलेला अक्षय्य तृतीयेचा सण आणि लग्नसराई यासाठी सोने खरेदी जोरात होण्याची शक्यता आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात 4 हजार रूपयांची घसरण नोंदवली गेली आहे. सोमवारी
भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 90,380 प्रति 10 ग्रॅम इतका होता. तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला तर एक तोळा सोने 55,400 रूपयांपर्यंत खाली घसरू शकते.सोन्याच्या दरात सध्या झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरीकन संशोधकांनी हा अनेक जागतिक कारणांचा एकत्रित परिणाम असल्याचे मत व्यक्त केले आहे.

भारतीय बाजार बहरणार

भारतात सोन्याला केवळ गुंतवणूकीचा नाही, तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्व आहे. थोड्याच दिवसांवर आलेली अक्षय्य तृतीया आणि सध्या सुरू असलेल्या लग्नसराईत दर घटले, तर ही खरेदीदारांसाठी मोठी पर्वणी ठरू शकते. हे दिवस सोने खरेदीच्या दृष्टीने महत्वाचे असतात.

वाढता पुरवठा आणि घटती मागणी

जागतिक पातळीवर सोन्याचा पुरवठा जलदगतीने वाढतोय, यामुळे उत्पादन वाढण्यास प्रोत्साहन मिळत आहे. जागतिक सोन्याचे राखीव साठे 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाले आहेत. केंद्रीय बॅंका आणि गुंतवणुकदारांनी जरी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली असली तरी सामान्य ग्राहकांची खरेदी घटली आहे. या सर्व बाबी आणि घटती मागणी यामुळे आगामी काळात सोन्याचे दर 55 हजारांपर्यंत खाली घसरले तर आश्चर्य वाटायला नको.


About Author

Rohit Shinde

Other Latest News