बापला संपवलं आता तुलाही…, झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी

झिशान यांना आलेल्या धमकी पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. पोलिसांनी झिशान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. झिशान यांच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर आरोपींना कठोर कारवाई व्हावे यासाठी ईशान आग्रही असून त्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी झिशान यांचेवडील बाबा सिद्दीकी यांना मारण्यात आले होते. या प्रकरणात बिश्नोई टोळीचे नाव समोर आले होते.

धमकीच्या मेलबाबत झिशान यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले. झिशान यांना धमकीमध्ये डी कंपनीचा उल्लेख आहे. ही धमकी अधिकृत डी कंपनीकडून आली आहे की नाही याविषयी तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

झिशान यांना सुरक्षा

झिशान यांना आलेल्या धमकी पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. पोलिसांनी झिशान यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. झिशान यांच्या वडिलांची हत्या झाल्यानंतर आरोपींना कठोर कारवाई व्हावे यासाठी ईशान आग्रही असून त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. झिशान यांना धमकी देण्यात बिश्नोई गँगचा हात आहे का याचाही तपास पोलिस करत आहेतय

बाबा सिद्दीकी यांची

काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला गोळीबार करत हत्या करण्यात आली. बांद्रा येथील सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये शुभम लोणकर हा मुख्य आरोपी असून तो लाॅरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी 29 जणांवर चार्टशिट दाखल केले आहे.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News