मुंबई – महायुतीचे सरकारी येऊन तीन-चार महिने होत आले आहेत. तरीही अजून रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुकलेला नाही. अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले होते. परंतु यावर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला. आणि इथले पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना मिळावे, अशी मागणे शिंदे गटाने केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 24 तासातच या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती.
उद्या पालकमंत्रीपदावर चर्चा…
दरम्यान, उद्या 12 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून, शिव पुण्यतिथीनिमित्त रायगड दौरा करणार आहेत. रायगडाला जाण्यापूर्वी ते खासदार सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आपले राजकीय वजन वापरून आपल्या मुलीच्या म्हणजे आदिती ठाकरे हिच्या गळ्यात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पाडून घ्यायवे ही रणनीती सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे असू शकते. अमित शहा हे महायुतीतील सर्वच निर्णय घेतात. त्यामुळे जो राज्यातील नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्रीपदाचा तिढा आहे, तो उद्या अमित शहांच्या उपस्थितीत सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा स्नेहभोजनाच्या कार्यक्रम करणार आहेत. यानंतर राजकीय चर्चा आणि पालकमंत्रीपदाचा तिढा यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटात अस्वस्थता…
दुसरीकडे उद्या अमित शहा हे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी जाऊन भेट देणार आहेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. रायगड जिल्ह्यातील आपण जुने कार्यकर्ते आहोत. तसेच लोकसभेला आपण खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी काम केले. पण त्यांनी विधानसभेला आपल्यासाठी काम केले नाही. आपल्या विरोधात काम केले असा आरोप भरत भोगावलेंनी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे आपणालाच मिळावे. अशी भूमिका भरत गोगावले आणि शिंदे गटाचे आहे. उद्या अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असणार आहेत. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले हे त्यावेळी उपस्थित राहणार का? आणि पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.