ठाण्याच्या काही भागांत बुधवारी पाणीपुरवठा राहणार बंद! सुरळीत कधी होणार?

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांत बुधवारी 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याबाबत महापालिकेकडून माहिती देण्यात आली आहे...

ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उद्या म्हणजेच बुधवारी 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विविध देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून या बाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे, नेमका कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार, त्याचबरोबर पाणीपुरवठा नेमका सुरळीत कधी होणार, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

कुठे पाणीपुरवठा बंद, कारण काय?

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवार (21 मे 2025) रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून रात्री 9.00 वाजेपर्यंत एकूण 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी ठाणे महापालिका क्षेत्रात घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रुस्तुमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरसिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणीपुरवठा 12 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.

ठाणेकरांना होणार मनस्ताप

ठाणे शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. या पाणीपुरवठा बंद ठेवण्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, स्वच्छता राखण्यास अडचणी, तसेच दैनंदिन जीवनातील इतर अडचणींचा सामना करावा लागतो आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. या समस्येवर उपाय म्हणून जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण करणे, अनधिकृत नळ जोडण्या रोखणे, तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे. यामुळे ठाणेकरांना होणाऱ्या मनस्तापात काही प्रमाणात कमी होऊ शकते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News