mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेमुळेच महायुती पुन्हा एकदा सतेत आल्याचं बोललं जातं आहे. दरम्यान, या योजनेत जानेवारी फेब्रुवारी महिन्यात गैरप्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता सरकारी कर्मचारी असलेल्या 2,652 लाडक्या बहिणींनी या योजनेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कधीपासून योजनेचा लाभ…
2,652 शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या या योजनेतील बँक खात्यात थेट जमा झाल्याचे आढळून आले. म्हणजे या सर्व महिलांनी गेल्या 9 महिन्यापासून 13 हजार 500 रुपये घेतल्याचे समोर आले आहे. या महिलांनी घेतलेल्या एकूण पैसाची रक्कम 3 कोटी 58 लाख रुपये एवढी होते. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एकूण 9 लाख महिलांना या योजनेतून विविध कारणामुळं अपात्र करण्यात आले होते. दरम्यान, या याजनेत किती शासकीय महिलांनी लाभ घेतला, हे तपासण्यासाठी मोहीम घेण्यात आली होती. त्यातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळं आता सरकार या महिलांवर कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार…
दरम्यान, आता सरकार अधिक सतर्क झाले असून, या योजनेत शासकीय कर्मचाऱ्यांचे अजून 6 लाख पडताळणी होणार असल्याचे माहिती समोर येत आहे. या योजनेत जे नियम आणि निकष आहेत त्या नियमात न बसणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं काही महिन्यापूर्वी निदर्शनास आलं होतं. 2.50 लाखाच्यावर वार्षिक उत्पन्न, घरी चारचाकी गाडी, तसेच कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत नको, असे सरकारचे या योजनेतील नियम आणि निकष सांगताहेत. मात्र असे असतानाही या योजनेत दोन लाख 2,652 लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.