पैसा फेको तमाशा देखो… असे आताचे राजकारण, पण उद्याचा दिवस आमचा असेल, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

पुढील दिवस हे आपलेच आहेत. आजचे सत्ताधारी हे सत्तेचा गैरवापर करतात. पैशा फेको तमाशा देखो असं आत्ताच राजकारण असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली.

Uddhav Thackeray – सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. अनेक पदाधिकारी, नेते हे शिंदे गटात किंवा भाजपकडे जात आहेत. यावरून उद्धव ठाकरेंनी मोठं भाष्य केलं आहे. आत्ताचे राजकारण म्हणजे सोयीचे आणि सत्तेचा गैरवापर करणारं राजकारण आहे. पैसा फेको आणि तमाशा देखो…, असं राजकारण असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. सोमवारी रायगडमधील काही कार्यकर्ते आणि नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

निवडणुकीच्या कामाला लागा…

दरम्यान,  आज आपल्याजवळ सत्ता नाही आहे. त्यामुळे आपल्या पक्षातून लोकं दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु आज जरी आपली सत्ता नसली तरी येणारा दिवस हा आपला आहे. त्यामुळे निराश होऊ नका… हाताश होऊ नका ..,आणि कामाला लागा ,असे आदेश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार अनंत गीते, मोठ्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उद्याचा दिवस आपला असेल

दुसरीकडे आज आपल्या पक्षातून अनेक आमदार, खासदार शिंदे गटात किंवा दुसरीकडे गेले आहेत. पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांना अमिषं दाखवून फोडले जात आहे. माजी नगरसेवकांना कोट्यावधी रुपये देऊन फोडले जात आहे. आज आपल्याकडे जरी सत्ता नसली तरी येणारा दिवस हा आपला असेल. त्यामुळे निराश न होता निवडणुकीच्या कामाला लागा. पुढील दिवस हे आपलेच आहेत. आजचे सत्ताधारी हे सत्तेचा गैरवापर करतात. पैशा फेको तमाशा देखो असं आत्ताच राजकारण असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News