मुंबई – माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन या दोघांमध्ये विस्तव जात नाही. या दोघांतील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मुख्यतः जळगाव जिल्ह्यातील राजकारणातील हे दोन मोठे नेते अनेक कारणावरून एकमेकांसोबत उभे टाकताना दिसतात. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर काही खळबळजनक आरोप केलेत. या आरोपाला मंत्री गिरीश महाजन यांनीही जोरदार जशात तसे उत्तर दिले आहे.
महाजनांचे महिलेसोबत संबंध…
दरम्यान, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर काही गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. एकनाथ खडसेंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या भाजपाचे संकटमोचक अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांचे एका आयएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचं एकनाथ खडसेंनी गंभीर आरोप केला होता. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना देखील माहित असून, गिरीश महाजन आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचेही व्हिडिओमध्ये खडसेंनी म्हटलं आहे.

महाजन आणि शहांमध्ये चर्चा काय?
विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी गिरीश महाजन यांना अमित शहांनी बोलावून घेतले होते. आणि तुमचे आयएस महिला अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत का? अशी विचारणा केली. परंतु माझे अनेक कामानिमित्त पोलीस अधिकारी, आयएस महिला अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत, असे महाजन यांनी म्हटले. परंतु तुमचे रात्रीचे संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा अमित शहांनी केला होता. असंही एकनाथ खडसेंनी व्हिडिओ म्हटल्याचं दिसत आहे. तसेच एका महिला अधिकाऱ्याचे आपणाला नाव माहित आहे. परंतु आपण सांगणार नाही असंही खडसेंनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
… तर तुम्हाला तोंड काळं करावं लागेल
एकनाथ खडसेंच्या आरोपना उत्तर देताना गिरीश महाजन यांनीही खडसेना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. मी घरातल्या गोष्टी बाहेर काढत नाही. मी जर तुमची एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला लोकं जोड्यांने मारतील. माझा सहनशीलतेचा अंत बघू नका. मी जर काही गोष्टींचा खुलासा केला तर एकनाथ खडसेंना तोंड काळ करून बाहेर पडावे लागेल. घरातील गोष्ट आहेत, पण मी बोलणार नाही. असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्यावर जे आरोप केलेत त्याचा एक पुरावा दाखवा. मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन, असं आव्हान देखील गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं आहे.