Pratap Sarnaik – राज्यात जादा एसटी तसेंच एसटीचे उत्पन्न वाढविन्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध मार्ग आणि उपाययोजना आणल्या आहेत. जेव्हापासून प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाच्या कारभार हाती घेतला आहे, तेव्हापासून त्यांनी परिवहन विभागात विविध उपक्रम राबविताना दिसत आहेत. दरम्यान, आता राज्यात ई-वाहन धोरणावर भर देणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
वाहन निर्मिती उद्योगांमध्ये महाराष्ट्र अव्वल…
दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ई-वाहन पॉलिसीवर प्रकाश टाकला. या पॉलिसीचा मुख्य उद्देश ई-वाहनांच्या उत्पादनाला चालना देणे, तसेच वापरकर्त्यांना प्रोत्साहन देणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. वाहन निर्मिती उद्योगांमध्ये महाराष्ट्राचे देशातील अग्रगण्य स्थान त्यांनी अधोरेखित केले. पुण्यात भारतातील सर्वात मोठ्या कमर्शियल वाहन व रोड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीवरील ‘कमर्शियल व्हेईकल फोरम 2025’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.

कमर्शियल वाहन क्षेत्राच्या बळकटीची गरज…
दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी कमर्शियल वाहन क्षेत्राच्या बळकटीसाठी अशा मंचांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. राज्य सरकारकडून या क्षेत्राला अधिक सक्षम व सुलभ बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. परिषदेत ‘ऑफ हायवे सेगमेंट’ पासून ते शाश्वत वाहतूक आणि ई-वाहन यांच्या उपायांबद्दल विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. तसेच, ‘द कमर्शियल व्हेईकल अँड फ्लीट ऍवार्ड’ अंतर्गत या क्षेत्रातील प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आगामी काळात एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं सरनाईक यांनी नमूद केले.