राज ठाकरेंना शिवसेना सोडायला भाग पाडणारे उबाठा आधुनिक काळातील दुर्योधन, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंची बोचरी टीका

घरी पाहुणे येतात त्याला आपण हॉटेल किंवा कॅफे म्हणतो का?, घराची टिंगलटवाळी करणाऱ्यांसोबत राज ठाकरे जातील का? अशी शंका खासदार म्हस्के यांनी उपस्थित करत उबाठा गटावर निशाणा साधला.

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळं राज्यातील दोन मोठे नेते तथा ठाकरे घराण्यातील दोन बंधू राज-उद्धव एकत्र येणार का? यावर चर्चा रंगत असून, मतमतांतर पाहयला मिळत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. पण युतीवरुन कोणीही माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नका, असा संदेश राज ठाकरे यांनी पाठवला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या युतीवरुन राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत असताना, आता या युतीवरुन शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर टिका बोचरी टिका केली आहे. आज त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

टिंगलटवाळी करणाऱ्यांसोबत राज ठाकरे जातील का?

उबाठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मात्र कामाचे निमित्त सांगून उबाठा आणि आदित्य ठाकरे फडणवीसांना भेटतात. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या पक्षाला भेसळ म्हटले आहे. खरचं भेसळ आहेत की असली ते खा. सुप्रिया सुळेंनी स्पष्ट करावे, असे आवाहन खासदार म्हस्के यांनी केले. तसेच घरी पाहुणे येतात त्याला आपण हॉटेल किंवा कॅफे म्हणतो का?, घराची टिंगलटवाळी करणाऱ्यांसोबत राज ठाकरे जातील का? अशी शंका खासदार म्हस्के यांनी उपस्थित केली. यावेळी त्यांना उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला.

शिंदेंची प्रगती म्हणून त्यांची लाही-लाही होते…

राज ठाकरेंच्या घराला कॅफेटेरिया म्हणणे, हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय राऊत बोलू शकतात का? असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तरोत्तर होणारी प्रगती आणि जनमाणसांतील प्रतिमा उजळल्याने उबाठा आणि संजय राऊत यांच्या शरिराची लाही लाही झाली असून, त्यांना आता कैलास जीवन लावावे लागेल, अशी नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला. तसेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी उबाठाने केवळ मुस्लिम मतांसाठी विरोध केला. त्यांनी हिंदुत्व सोडले आहे, असा हल्लाबोल म्हस्के यांनी उबाठा गटावर केली.


About Author

Astha Sutar

Other Latest News