ठरलं तर मग! ‘या’ दिवशी येणार लाडक्या बहिणींचा जून महिन्याचा हफ्ता, लाभ कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही

आतापर्यंत एकूण 11  महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारने जमा केले आहेत. मात्र जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणी उपस्थित करताहेत.

Ladki Bahin Yojana – विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेला महाराष्ट्रात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळालाय. जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत पंधराशे रुपये मिळतात. या योजनेत मे महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींना मिळाला, मात्र जून महिन्याच्या हफ्ता कधी येणार, याकडे लाडक्या बहिणींची नजर लागली असताना, आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

जून महिन्याचा हफ्त कधी?

दरम्यान, योजना आल्यापासून लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून मिळतात. पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटीमार्फत 1500 रुपये जमा होतात. या योजनेचा लाभ गेल्या जुलै २०२४ महिन्यापासून देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 11  महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारने जमा केले आहेत. मात्र जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणी उपस्थित करताहेत. मात्र आता जून महिन्याचा 12वा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत महिला व बाल विकास विभागाकडून अशी माहिती देण्यात आली नाही. मात्र पुढील आठवड्यात हफ्ता येण्याची शक्यता आहे.

2100 रुपयावरुन विरोधक आक्रमक…

दुसरीकडे लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असं निवडणुकीपूर्वी सरकारने जाहीरनाम्यात आणि प्रचारात म्हटलं होतं. पण आतापर्यंत सरकार फक्त १५०० रुपये देत आहे. २१००रुपयांचे काय झालं? ते तुम्ही कधी देणार? असा सवाल विरोधक करताहेत. तर लाडक्या बहिणींची आर्थिक उत्पन्नाची वार्षिक माहिती देण्यास प्राप्तिकर विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहीणी ज्या उत्पन्नाच्या निकषात बसत नाहीत, त्यांना या योजनेतील लाभ बंद होणार आहे.

About Author

Astha Sutar

Other Latest News