मुंबई – सध्या देशात एकाधिकारशाही आणि हुकुमशाही वाढत असुन, देशातील संविधान धोक्यात असून, लोकशाही हळूहळू संपुष्टात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार करत आहे. असा घणाघात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर केला. बुधवारी राष्ट्रीय काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमध्ये पार पडले. यावेळी ते बोलत होते.
जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण…
पुढे बोलताना मल्लिकार्जुन खरेदी म्हणाले की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आनण्याचे काम सरकारकडून होत आहे. मुख्य विषय बाजूला ठेवून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकार मनमानी वागत आहे. वकफ सुधारणा विधेयक यावर संसदेत चर्चा होत असताना विरोधकांना बोलू दिले नाही. राहुल गांधीना बोलू दिले नाही. देशातील अनेक हुशार लोक विदेशात जात आहे. परंतु परदेशातून त्यांना वेड्या घालून देशात आणले जात आहे. यावर मोदी चिडीचूप आहेत. कोणती भूमिका घेत नाहीत… शांत बसले आहेत. आधी काँग्रेसचे सरकार होते पण अशा तऱ्हेने ते लोकांना वागणूक देत नव्हते. असा प्रहार मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर केला.
… म्हणून ते निवडणुकीत जिंकले
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात विजय मिळाला. ईव्हीएममध्ये घोटाळा करून त्यांनी विजय मिळवला आहे. जर बॅलेट पेपरवर मतदान झाले असते तर यांचा पराभव झाला असता. परंतु ईव्हीएम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निकाल आपल्या बाजूने केला आहे. महाराष्ट्रात सरकारच्या बाजूने संताप होता. महागाई वाढली आहे .. बेरोजगार वाढले आहेत… अशा काळात लोकांचा उद्रेक असताना महाराष्ट्रात यांना कसा काय विजय मिळू शकतो? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित करून हा यांचा ईव्हीएम विजय असल्याचे टीका मल्लिकार्जुन खरेदीने भाजपावर केली आहे.
