‘शाळा प्रवेशोत्सव 2025’ : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर उपस्थित राहणार

आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, अन्य मंत्री, खासदार, आमदार हे स्वागत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

School Entrance Festival  – आज राज्यात शाळा सुरु होणार आहे. आजपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. राज्यातील विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये सोमवार (16 जून, 2025) शाळा सुरू होणार असून, शाळेच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, तालुका, जिल्हा पालघर या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

उपमुख्यमंत्री ठाण्यात विद्यार्थ्यांचे स्वागत करणार…

दरम्यान, आज विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. यात मंत्री, खासदार, आमदार हे स्वागत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनपा शाळा क्रमांक 23, किसन नगर, ठाणे तसेच शिवडी वडाळा इस्टेट मनपा शाळा, आंध्रा हायस्कूल जवळ, वडाळा या शाळेत उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आहेत.

शिक्षणमंत्री नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करणार… 

दुसरीकडे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तुंगण दिगर तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा करंजी, ता. जि. वर्धा येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News