‘सचेत’ प्रणालीवरून १९ कोटी मोबाईल लघु संदेशाद्वरे पाऊस, वीज सतर्कतेचे संदेश, राज्य आपत्कालीन केंद्र बचाव व मदतीसाठी तत्पर

मान्सूनचे आगमन १५ दिवस अगोदर झाले आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन २५ मे रोजी झालेले असून मुंबईमध्ये २६ मे रोजी दाखल झालेला आहे. दरवर्षी मान्सूनचे आगमन ११ जूनला होते. 

State Emergency Centre : राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये २४ ते २६ मे मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बचाव व मदत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून २४ तास अधिकारी, कर्मचारी उपलब्ध आहेत. आणि ते मदत करताहेत. दरम्यान, अतिवृष्टीच्या आपत्ती काळात सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे.

पूर्व सूचना देऊन नागरिकांना सतर्क…

दरम्यान, ‘सचेत’ या प्रणालीवरून लोकांना पाऊस व विजेचे पूर्व सूचना देताना २६ व २७ मे या दोन दिवसांमध्ये नागरिकांना १९ कोटी २२ लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले, यातून ५२ पूर्व सूचना देऊन नागरिकांना सतर्क करण्यात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली. तसेच आपत्कालीन परिस्थितीत ‘सचेत’ प्रणालीवरून लोकांना पाऊस व वीजबाबत पूर्व सूचना दिल्या जात आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशा एकूण चार पथके राखीव ठेवण्यात आली आहेत.

पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश

पुणे जिल्ह्यातील मौजे काटेवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या सात लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर इंदापूर येथे पूर परिस्थितीत अडकलेल्या दोन व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बारामती तालुक्यातून ७०-८० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालावधीत फलटण १६३.५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन १५ दिवस अगोदर झाले असून, राज्य आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याचे संचालक सतीशकुमार खडके यांनी सांगितलेय.


About Author

Astha Sutar

Other Latest News