रणजित कासलेला कायमचा धडा, अंगावर चढवता येणार नाही ‘खाकी’

रणजित कासले हा पोलिसांना शरण जाण्यासाठी पुण्यात आला होता. तो स्वारगेटमधील एका हाॅटेलमध्ये थांबला होता. गुरुवारी सकाळी बीड पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले त्यांनी कासलेला ताब्यात घेतले.

बीड :  निलंबित पोलिस पीएसआय रणजित कासले याला पोलिस दलाने कायमचा धडा दिला आहे. व्हिडिओ करून आरोप करणाऱ्या कासलेला आज पुण्यातून बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात येत असल्याचा आदेश काढले. त्यामुळे निलंबित कासलेला आता पुन्हा पोलिस सेवेत जाण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे.

पोलिसांना आव्हान देणारा रणजित कासले गुरुवारी रात्री दिल्लीवरून पुण्यात दाखल झाला. आपण पोलिसांना शरण जाणार आहोत असे त्याने जाहीर केले. त्यावेळी देखील त्याने आमदार धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले. मुंडे योग्य मार्गाने निवडून आले नाहीत, असा दावा केला. आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती मात्र अशी ऑफर बंददार आड दिली जाते त्यामुळे त्याचे आपल्याकडे पुरावे नसल्याचे म्हटले.

धनंजय मुंडेंनी 10 लाख दिले

रणजित कासले याने माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात त्याला ईव्हीएमपासून लांब राहण्यासाठी 10 लाख रुपये धनंजय मुंडेंच्या कंपनीने दिले. ते आपल्या बँक खात्यावर पाठवल्याचे स्टेटमेंट देखील कासले याने पाठवले. मुंडे हे योग्य मार्गाने निवडून आले नसल्याचे ही कासले याने म्हटले.

पुण्यात ताब्यात बीडला रवाना

रणजित कासले हा पोलिसांना शरण जाण्यासाठी पुण्यात आला होता. तो स्वारगेटमधील एका हाॅटेलमध्ये थांबला होता. गुरुवारी सकाळी बीड पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले त्यांनी कासलेला ताब्यात घेत ते बीडकडे रवाना झाले. बीडमध्ये पोलिल त्याला घेऊन पोहोचत असतानाच कासले याला पोलिस सेवेतून बडतर्फ केले.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News