मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे नेते ठाकरे घराण्यती दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे बंधूंचं मनोमिलन मुंबई महापालिका निवडणुकीसाठीसाठी होईल? की महाराष्ट्रातील मराठी मुद्द्यांसाठी होईल?, यावर विविध तर्कवितर्क लावले जाताहेत. तर राजकीय नेत्यांच्याही यावर प्रतिक्रिया उमटत असताना आता शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरेंनी हात पुढे करताना सबुरीचा सल्ला दिला आहे.
तुमचेच पाय खेचले जातील…
दरम्यान, मंत्री योगेश कदम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं की, “सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला – उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते श्री. नारायणजी राणे, स्व.श्री. मनोहरजी जोशी, श्री. दिवाकरजी रावते, श्री. लीलाधर डाके, श्री. रामदासभाई कदम आणि श्री. एकनाथजी शिंदे यांना सुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको. त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो – जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील”. असा सबुरीचा सल्ला कदम यांनी राज ठकारेंनी दिला आहे.

मनसेची सावध भूमिका…
दुसरीकडे राज-उदधव बंधू एकत्र येत असतील तर काही लोकांच्या पोटात का दुखत आहे. आमच्याकडून कोणतीही अट नसल्याचं सांगत वाद घालू नका, असं राऊत म्हणाले आहेत. तर राज ठाकरेंचं वक्तव्य व्यापक स्वरुपातलं होतं, ते निवडणुकांशी जोडणं चुकीचं ठरेल, असं संदीप देशपांडे म्हणालेत. तर निवडणुकासाठी अशी अभद्र युती नको, अशी भूमिका अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन मांडलीय. पण मंत्री योगेश कदमांनी केलेल्या पोस्टवर ठाकरे गटाकडून काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.