पाटणा : सायबर चोरट्यांमुळे अनेकांना आपल्या आयुष्याची कमाई गमवावी लागत असल्याचे आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र, सायबर चोरट्यांमुळे पुण्यातील एका व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागल्याचे उघडकीस आले आहे.
सायबर चोरट्यांच्या भूलथापांना बळी पडून हा व्यावसायिक बिहारमध्ये स्वस्तात मशिनरी खरेदी करण्यासाठी गेला होता. मात्र, तेथे त्याचे अपहरण करून खंडणीसाठी गळा दाबून हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव लक्ष्मण शिंदे (वय 55) असे आहे. त्यांचा मृतदेह जहानाबाद जहानाबाद जिल्ह्यातील झुमकी-मानपूर गावाच्यामध्ये असलेल्या रस्त्यावर मिळावा.

मृतदेहाची ओळख पटत नाही म्हणून पोलिस बेवारस मृतदेह म्हणून अंत्यसंस्कार करणार होते. मात्र, पाटना पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली त्यामुळे अंत्यसंस्काराची प्रकिया थांबण्यात आली.
11 एप्रिलला बिहारला रवाना
सायबर चोरट्यांनी शिंदे यांच्यासोबत ईमेलद्वारे संपर्क साधला होता. कमी किंमतीत मशिनरी मिळेल, असे आश्वासन त्यांना दिले. त्यामुळे 11 एप्रिलला तो इंडिगोच्या विमानाने ते पाटण्याला गेले. तेथे त्यांनी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने त्यांना घेण्यासाठी गाडी पाठवली होती. त्या गाडीतून झारखंडमधील एक कंपनीत जाऊन मशिनरीची पाहणी करणार असल्याचे शिंदे यांनी आपली पत्नी रत्नप्रभा यांनी सांगितले.
…आणि संशय आला
लक्ष्मण शिंदे यांच्या पत्नीने सांगितले की, 11 एप्रिलला मी नऊ वाजता फोन केला तर त्यांचा फोन बंद होता. पुन्हा काही वेळात फोन केला तर दुसऱ्याच व्यक्तीने फोन उचलला आणि लक्ष्मण शिंदे बाथरुमला गेल्याचे सांगितले. मात्र, पुन्हा फोन केला असता त्यांचा फोन बंद लागला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दिली. पोलिसांना त्यांचे शेवटचे लोकेशन नालंदाच्या जवळ दिसत होते. पुणे पोलिसांनी पाटण्यातील पोलिसांना लक्ष्मण शिंदे यांचे काही फोटो देखील पाठवून दिले होते. त्यामुळे बेवारस मृत्यदेह म्हणून मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटवता आली.