Aditya Thackeray : मुंबईतील सण, उत्सव काळात विकाकारण पोलिस मंडळांना त्रास देतात. पावसाळी अधिवेशनात आज विधानसभेतील सभागृहात लक्षवेधी मांडताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी उत्सव काळात मंडळांना पोलिस त्रास देत असल्याचे म्हटले. महाराष्ट्रात आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र आणि दहीहंडी या प्रमुख सणांच्या काळात सार्वजनिक मंडळांना होणाऱ्या त्रासावर आमदार आदित्य ठाकरेंनी लक्षवेधीद्वारे सूचना मांडताना आवाज उचलला.
त्रास देणाऱ्यांवर कारवाई होणार का?
दरम्यान, अनेकदा मी पाहतो, स्थानिक पोलीस स्टेशनमधून मंडळांना सतावले जाते, परवानगी असतानाही सतावले जाते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, जर मंडळांनी डेसिबल पातळीचे पालन केले असेल आणि सर्व परवानग्या असतील, तर त्यांना त्रास दिला जाणार नाही याची मुख्यमंत्र्यांनी खात्री द्यावी. भोंग्यांचे ठीक आहे, मात्र आमच्या गणेशोत्सव, नवरात्र उत्सवाची मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी. गणपती, नवरात्र आणि दहीहंडी सण येणार आहेत. जर असे सतावले गेले, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही…
दुसरीकडे याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निश्तिच याबाबत चौकशी केली जाईल, आणि सण, उत्सव काळात मंडळांना पोलिसांकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही… त्रास होणार नाही. याची सरकार खबरदारी घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार आदित्य ठाकरेंना दिली. तर अनधिकृत भोंग्यांच्या नियमांचे पालन करण्याबरोबरच, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील मिरवणुका आणि तात्पुरत्या धार्मिक स्थळांच्या (मंडपांच्या) परवानग्यांबाबत पोलीस प्रशासनाकडून मंडळांना त्रास दिला जात असल्याच आदित्य ठाकरे यांनी मुद्दा उपस्थित केला होता.