अकोला : आमदाराला शिवीगाळ करणं पोलिसी निरीक्षकाला चांगलच महागात पडणार आहे. कारण या पीआयची बदली थेट पोलिस नियंत्रणात कक्षात केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. तपासानंतर पीआयवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंगळे यांनी पीआय प्रकाश तूनकलवार यांनी शिवीगाळ करण्याचा आरोप केला होता. जनावरांच्या तस्करीसंदर्भात कारवाईसाठी आमदार हरीश पिंगळे यांनी तूनकलवार यांना फोन केल होता. मात्र, तूनकलवार यांनी आपल्याला शिवीगाळ करण्याचा आरोप आमदार पिंगळे यांनी केला.

गृहमंत्र्यांना ऑडिओ मेसेज
पीआयने आपल्याल शिवीगाळ केल्याचा ऑडीओ मेसेज आमदार पिंगळे यांनी गृहमंत्र्यांकडे केला होता. तसेच पीआयची तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली होती. जर पीआयवर कारवाई झाली नाही तर राजकारणी आणि आमदारांची प्रतिष्ठा राहणार नाही, असे म्हटले होते.
पोलिस अधिक्षकांकडून दखल
आमदार पिंगळे यांनी केलेल्या तक्रारीच दखल अकोला पोलिस अधिक्षकांनी गंभीरपणे घेतली. आमदार पिंगळे यांनी आरोप केला होता की महामार्गवरून कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणऱ्या वाहनांची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही पैसे घेऊन तस्करी करणारी वाहनं सोडून देण्यात आली. याविषयी जाब विचारला असता बार्शीटाकळीचे पीआय तूनकलवार यांनी नशेत आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप केला.