मुंबई – छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलेत तापले आहे. यावरून सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे, त्या खुलताबादचेही नामांतर करण्यात येईल. असं मंत्री संजय शिरसाठ यांनी घोषणा केली आहे.
खुलताबादचे नवे नाव काय?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी औरंगजेबच्या कबरीवरून नागपूर येथे मोठा हिंसाचार झाला होता. औरंगजेबची कबर हटवली पाहिजे असं काही हिंदुत्ववादी संघटनेना मागणी केली होती. परंतु ती कबर संरक्षित असून हटवता येणार नाही. आम्ही औरंगजेबचे उदातीकरण होऊ देणार नाही. असेही स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. हा मुद्दा चर्चेत असताना आता छत्रपती संभाजीनगर येथील ज्या ठिकाणी औरंगजेबची कबर आहे. त्या खुलताबादचे नाव बदलून रत्नपुर असे नाव केले जाईल. अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे आता लवकरच खुलताबादचे रत्नपुर होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक उभारणार…
दरम्यान पुढे बोलताना मंत्री संजय शिरसाठ म्हणाले की, महायुतीचे सरकार हे तळागाळातील लोकांसाठी काम करते. हिंदुत्ववादी सरकार आहे… आणि या सरकारने नाव बदलण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. याच्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे नाव बदलले. तसेच धाराशिव, अहमदनगर आदी नाव बदलण्यात आली आहेत. आता दौलताबादचे ही नामांतर होणार आहे. आणि नवे नाव रत्नपुर असे करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगरचे पूर्वी खडकी असे नाव होते. कालांतराने त्याचे नाव औरंगाबाद झाले. त्याप्रमाणे खुलताबादचे नाव पूर्वी रत्नपुर होते. परंतु कालांतराने खुलताबाद झाले. पण आता खुलताबादचे रत्नपुर असे नामांतर करण्यात येईल. तसेच या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक उभारण्यात येईल, असे मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले.