Eknath Shinde – २०१४ नंरत देशात मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तसेच गोरगरिबांसाठी राहण्यासाठी घरांचे स्वप्न पूर्ण केले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सामान्य लोकांना कमी किंमतीत आणि सबसिडी मिळवून देत, त्यांच्यासाठी निवाराची सोय केली दरम्यान, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी नव्या १०,२९,९५७ घरांना मंजुरी दिली आहे. त्यामुळं राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल,
सर्वप्रथम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, यांचे मनःपूर्वक आभार…
मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी नव्या १०,२९,९५७ घरांना मंजुरी दिली आहे. याआधी राज्यासाठी एकूण ३३,४०,८७२ घरे मंजूर झाली होती. या नव्या मंजुरीनंतर…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 3, 2025
उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार…
दरम्यान, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी नव्या १०,२९,९५७ घरांना मंजुरी देण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी यापूर्वीच विक्रमी २० लाख घरांच्या मंजुरी मिळाली होती. नव्या घोषणेबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मनःपूर्वक आभार मानतो. शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज एका पत्राद्वारे ही शुभवार्ता दिली. पुनश्च आभार… असं एकनाथ शिंदेंनी मोदींचे आभार मानलेत.
शिंदेंची सोशल मीडियावर पोस्ट…
मोदींच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “सर्वप्रथम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, यांचे मनःपूर्वक आभार… मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी नव्या १०,२९,९५७ घरांना मंजुरी दिली आहे. याआधी राज्यासाठी एकूण ३३,४०,८७२ घरे मंजूर झाली होती. या नव्या मंजुरीनंतर महाराष्ट्रासाठी मंजूर घरांची एकूण संख्या आता ४४,७०,८२९ इतकी झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रासाठी यापूर्वीच विक्रमी २० लाख घरांच्या मंजुरी मिळाली होती. नव्या घोषणेबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे मनःपूर्वक आभार मानतो. शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज एका पत्राद्वारे ही शुभवार्ता दिली. पुनश्च आभार…” असं पोस्टमध्ये एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.